रकुलप्रीत-जॅकीच्या लग्नाच्या विधींना सुरुवात, दुपारी 3 नंतर अडकणार लग्नबंधनात!

अर्जुन कपूर, वरुण धवन-नताशा दलाल, आयुष्मान खुराना-ताहिरा कश्यप, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांच्यासह त्याचे जवळचे मित्र लग्नाला उपस्थित राहण्यासाठी गोव्यात पोहोचले आहेत

    सध्या सिनेसृष्टीत लग्नाचा सिझन सुरु झाला आहे. नुकतचं स्टाईल फेम अभिनेत साहील खान लग्नबंधनात अडकला. 47 वर्षीय साहीलने 21 वर्षीय विदेशी सुंदरीसोबत लग्न केलं. आता बॉलिवूडमधील एक कपल लवकरच लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झालं आहे. बॉलिवूडच्या सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक असलेल्या रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी (Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding) यांच गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग होत आहे. गेल्या दोन दिवसापासून हे कपल गोव्यात दाखल झालं असून आज सकाळपासूनच लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. दुपारनंतर दोघेही लग्नबंधनात अडकतील.

    रकुलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानी आज  संध्याकाळी अधिकृतपणे एकमेकांशी लग्न करणार आहेत. काही दिवसांपासून गोव्यात दोघांच्या लग्नाचे विधी सुरू आहेत. अर्जुन कपूर, वरुण धवन-नताशा दलाल, आयुष्मान खुराना-ताहिरा कश्यप, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांच्यासह त्याचे जवळचे मित्र लग्नाला उपस्थित राहण्यासाठी गोव्यात पोहोचले आहेत आणि काही छायाचित्रेही समोर येत आहेत. 20 तारखेला त्यांचा संगीत कार्यक्रम होता. उर्वरित विधी आज पार पडत आहेत.