‘या’ दिवशी होणार राणा दा आणि पाठक बाईंचं शुभमंगल सावधान

राणा दा आणि पाठक बाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची उत्सुकता सर्वच चाहत्यांना लागली होती. 3 मे 2022 रोजी या जोडीने दणक्यात साखरपुडा करून आपल्यातील नात्याची कबुली दिली.

    झी मराठी वरील तुझ्यात जीव रंगला (Tuzhyat Jeev Rangala) या मालिकेतील राणा दा आणि पाठक बाई ही ऑनस्क्रीन वरील लोकप्रिय जोडी आत खऱ्या आयुष्यात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्याही घरी या लग्नासोहोळ्याची तयारी सुरु असून याचे फोटो दोघेही आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत. येत्या सहा दिवसात या दोघांचा विवाह होणार आहे.

    मध्यंतरी अक्षयाची लग्नाची साडी विणतानाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. साखरपुड्याच्या सहा महिन्यानंतर दोघे लग्न करणार असून १ किंवा २ डिसेंबर रोजी ते लग्नबंधनात अडकणार असा अंदाज लावला जात आहे.

    पुण्यात अगदी पारंपरिक पद्धतीने हे लग्न पारपडणार असून मनोरंजन सृष्टीतील अनेक मंडळींची उपस्थिती त्यांचा लग्नसोहोळ्याला असणार आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा आणि पाठक बाईंची प्रेमकथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती. आता हेच पात्र निभवणारे कलाकार वैयक्तिक आयुष्यात देखील एकमेकांशी लग्न करणार असल्याने चाहते आनंदीत झाले आहेत.