रणबीर कपूर आलिय भट अयोध्येला देणार भेट,राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याचं मिळालं निमंत्रण!

येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला अनेक सेलेब्रिटी हजेरी लावणार आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनाही राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आलं आहे.

    अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला (Ram Mandir Inauguration Ceremony) काही दिवसांवर आला आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी सध्या जोरात तयारी सुरू आहे. कार्यक्रमासाठी अनेक पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आली आहेत. राजकारण्यांसह अनेक कलाकारांनाही या सोहळ्यासाठी आंमत्रित करण्यात आलं आहे. नुकतचं मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात देण्यात आलं आहे.

    रणबीर-आलियाला निमंत्रण

    येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्धघाटन सोहळ्यासाठी अनेक सिनेकलाकारांना आमंत्रण देण्यात आली आहे. काही दिवसापुर्वी अभिनेत्री कंगन रानाैतलाही राम मंदिर उद्धघाटन सोहळ्यांच आमंत्रण मिळालं. कंगनानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली होती. आता  रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे.  आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, आरएसएस कोकणचे प्रांतीय प्रचार प्रमुख अजय मुडपे आणि निर्माता महावीर जैन यांच्याकडून श्री रामजन्मभूमी मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रणे मिळाली आहेत. आलिया आणि रणबीर हे निमंत्रण स्विकारतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

     ‘या’ कलाकारांनाही आमंत्रण

    बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार राम मंदिराच्या उद्धघाटन सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अक्षय कुमार, रजनीकांत, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, मोहनलाल, धनुष, ऋषभ शेट्टी मधुर भांडारकर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अजय भट्ट, सनी देओल , प्रभास आणि यश यांना राम मंदिराच्या उद्धाटन कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे.