कोणता चित्रपट होणार सुपरहिट? रणबीर कपूर आणि विकी कौशलच्या चित्रपटांमध्ये चुरशी लढत

बॉक्स ऑफिसवर पुढील महिन्यात प्रसिद्ध अभिनेत्यांच्या चित्रपटांची टक्कर होणार आहे आणि १ डिसेंबर या दिवसाकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.

    अ‍ॅनिमल-सॅम बहादूर : २०२३ चा काळ लवकरच संपणार आहे. वर्षाचा शेवटचा महिना लवकरच सुरु होणार आहे. त्याचबरोबर या वर्षाच्या शेवट हा मनोरंजनानं होणार आहे. कारण डिसेंबर महिन्यामध्ये विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट रिलीज होणार आहेत आणि त्यामुळे बॉलीवूडमध्ये पैशांचा पाऊस पडणार असं चित्र पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर पुढील महिन्यात प्रसिद्ध अभिनेत्यांच्या चित्रपटांची टक्कर होणार आहे आणि १ डिसेंबर या दिवसाकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. कारण या दिवशी अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir kapoor) अ‍ॅनिमल (Animal) हा चित्रपट आणि विकी कौशलचा (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur) हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

    सूत्रांच्या माहितीनुसार या दोन्हीही चित्रपटांच्या ऍडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. आता ऍडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी या दोन्ही चित्रपटांना किती कलेक्शन केलं आहे. ऍडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटानं बाजी मारली आहे. अ‍ॅनिमल या चित्रपटानं ऍडव्हान्स बुकिंगमध्ये सॅम बहादुर या चित्रपटाला मागे टाकले आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, संपूर्ण भारतात अ‍ॅनिमल चित्रपटाच्या १११,००० पेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली आहे, ज्यात ९०,५२६ तिकिटे हिंदीमध्ये, २०,५९१ तेलुगू भाषिक प्रदेशात आणि २०० तमिळ भाषिक भागात आहेत. या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये ३.४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

    सॅम बहादुर चित्रपटाची जवळपास १२,८७६ तिकीटे विकली गेली आहेत, ऍडव्हान्स बुकिंगमध्ये सॅम बहादुर चित्रपटानं ४४.७१ लाख रुपयांचे कलेक्शन केलं आहे. सॅम बहादुर हा चित्रपट मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे.या चित्रपटात विकी हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात फातिमा सना शेखनं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. तर सान्या मल्होत्रानं या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लू माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे.