ranbir kapoor happy birthday

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor Birthday Special Article) जन्म २८ सप्टेंबर १९८२ रोजी झाला. आपल्या वडिलांप्रमाणे आणि आजोबांप्रमाणेच रणबीरने अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट काम केलं आहे.

  ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor Birthday Special Article) जन्म २८ सप्टेंबर १९८२ रोजी झाला. आपल्या वडिलांप्रमाणे आणि आजोबांप्रमाणेच रणबीरने अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट काम केलं आहे. (Happy Birthday Ranbir Kapoor) रणबीर कपूरने आपले प्राथमिक शिक्षण मुंबईतूनच पूर्ण केले. मात्र त्याच्या शैक्षणिक काळातील एक खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का ?(Ranbir Kapoor Birthday 2021)

  दहावी पास झाल्याबद्दल आजीने ठेवली होती पार्टी
  रणबीरला सुरुवातीपासूनच अभ्यासामध्ये विशेष रस नव्हता. त्याला नेहमी क्रीडा क्षेत्रात आवड होती. रणबीर कपूर दक्षिण मुंबईच्या माहीम येथील बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकला. रणबीर दहावी पास झाला तेव्हा त्याची आजी कृष्णा कपूर यांनी त्यांच्या घरी एक मोठी पार्टी आयोजित केली होती.रणबीर कपूरला दहावीत फक्त ५४.३% मिळाले होते. पण तो अभ्यासात फार हुशार नसल्याने तो दहावी पास झाला ही गोष्ट घरच्यांसाठी खूप मोठी होती. त्यामुळे तो दहावी पास झाल्यावर पार्टी आयोजित करण्यात आली होती.

  पार्टीत सांगितले खोटे मार्क्स
  कपूर फॅमिलीच्या या पार्टीला अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननेही हजेरी लावली होती. रणबीर कपूरने पार्टीमध्ये ऐश्वर्या रायला खोटे मार्क्स सांगितले होते. त्याने ६५ % गुण मिळ‌ाल्याचं सांगितलं होतं. याचा खुलासा ऐश्वर्या राय बच्चनने स्वतः ‘द कपिल शर्मा शो’मध्ये केला होता.

  रणबीरचा आजवरचा चित्रपट प्रवास
  रणबीर कपूर याने २००७ मध्ये संजय लीला भन्साळींच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याआधी त्याने संजय लीला भन्साळी यांना अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या ‘ब्लॅक’ मध्ये सहाय्य केले होते. ‘सावरिया’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, पण या चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळवून दिली.

  ‘सावरिया’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘रॉकस्टार’ आणि ‘बर्फी’ नंतर रणबीर कपूरने सिद्ध केले की, तो एक चांगला कलाकार आहे. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या रोमँटिक कॉमेडीमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी रणबीरचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. २०१० मध्ये, प्रकाश झाच्या ‘राजनीती’त रणबीरने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

  ‘अंजाना-अंजानी’, ‘ये जवानी है दीवानी’, ‘तमाशा’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘जग्गा जासूस’ या चित्रपटांपासून संजय दत्तच्या बायोपिक ‘संजू’ पर्यंत रणबीर कपूरने आपल्या अभिनयाचा कस दाखवला आहे. चित्रपटांव्यतिरिक्त रणबीर कपूर अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत असल्यामुळे देखील चर्चेत आहे.