रणबीरला ‘ॲनिमल’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलियाच्या नावावर!

फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर चर्चेत होते. रणबीर कपूरला ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये ॲनिमलसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटासाठी आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

  गुजरातमधील गांधीनगर येथे 69 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. हा दोन दिवसीय उत्सव 27 जानेवारी 2024 रोजी सुरू झाला. रविवारी मुख्य श्रेणींमध्ये पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. रणबीर कपूरला फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार (Ranbir kapoor won the Filmfare Best Actor Award) मिळाला आहे. ‘ॲनिमल’ चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचबरोबर आलिया भट्टला महिला वर्गात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आलिया भट्टला (Aliya Bhatt) हा पुरस्कार ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या (RRKPK)चित्रपटासाठी देण्यात आला आहे.

  शबाना आझमी यांनी आलियाला दिला पुरस्कार

  आलिया भट्टला हा पुरस्कार ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी देण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी आलियाला स्टेजवर हा पुरस्कार दिला. शबाना आझमी यांना ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी महिला वर्गात सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Filmfare (@filmfare)