ranbir kapoor and alia bhat

रणबीर आणि आलियाच्या साखरपुड्याच्या चर्चांना रणबीरचे काका रणधीर कपूर(randhir kapoor) यांनी पूर्णविराम दिला आहे. रणबीर आलियाच्या साखरपुड्याच्या केवळ अफवा आहेत असं त्यांनी सांगितले आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर(alia bhat and ranbir kapoor) यांच्या साखरपुड्याविषयी(engagement) जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानला त्यांनी गुपचूप साखरपुडा उरकणार असल्याच्या चर्चा आहे. या चर्चांना रणबीरचे काका अभिनेता रणधीर कपूर(randhir kapoor) यांनी पूर्णविराम दिला आहे. रणबीर आलियाच्या साखरपुड्याच्या केवळ अफवा आहेत असं त्यांनी सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor 🔵 (@ranbir_kapoooor)

रणधीर कपूर म्हणाले की, साखरपुड्याच्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाही. जर आज रणबीर आणि आलियाचा साखरपुडा असता तर आमचं सगळं कुटुंब त्यांच्यासोबत असतं. रणबीर, आलिया आणि नीतू कपूर हे केवळ  सुट्टीसाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी राजस्थानमध्ये गेले आहेत. त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चा या निव्वळ चुकीच्या आहेत. अफवा आहेत.

नवीन वर्षाचं स्वागत एकत्र करण्यासाठी आलिया, रणबीर आणि नीतू कपूर हे राजस्थानला गेले आहेत. तसेच रणवीर सिंग व दीपिका पदुकोणदेखील तिकडे गेले आहेत. यावेळचे काही फोटो नीतू कपूर यांनी शेअर केले आहेत.