pushpa 2 ranveer singh

‘पुष्पा 2’सिनेमाचा टीझर आणि पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलं आहे. पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता खूपच वाढली आहे.

  दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या ‘पुष्पा द राईज’ (Pushpa The Rise) या सिनेमाला प्रचंड यश मिळालं होतं. आजही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. अल्लू अर्जुनचे चाहते या सिनेमाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. या सिनेमात कोणते कलाकार काम करणार याबद्दलही उत्सुकता आहे. आता ‘पुष्पा 2’ (Pushpa 2 Movie Update) मधील कलाकारांविषयी एक मोठी अपडेट आली आहे. ती म्हणजे ‘पुष्पा 2’ या सिनेमात बॉलिवूडचा एक सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत झळकणार आहे. या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी बघणे त्यांच्या चाहत्यांसाठी  मोठी पर्वणी असणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

  मीडियामध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार ‘पुष्पा 2’ सिनेमात बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग (Ranveer Singh In Pushpa) दिसणार आहे. रणवीर या सिनेमात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. या सिनेमात रणवीर असल्यानं कथानकात काही बदल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या सिनेमात प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट आणि साहसी दृश्य बघायला मिळणार आहेत.

  ‘पुष्पा 2’ सिनेमासाठी रणवीर सिंह एक सरप्राईज एलिमेंट असेल. रणवीर सिंह ‘पुष्पा 2’ मध्ये दिसणार का, यावर स्वतः रणवीरनं किंवा ‘पुष्पा 2’ निर्मात्यांकडून अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेलं नाही. मात्र असं जर झालं तर रणवीर सिंग ‘पुष्पा 2’मधून दाक्षिणात्य सिनेमा विश्वात पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. ‘पुष्पा 2’ सिनेमातील दमदार व्यक्तिरेखेसह तो दाक्षिणात्य प्रेक्षकांना देखील आपल्या चाहत्यांच्या यादीत सामील करणार आहे.

   ‘पुष्पा 2’ जमवणार चांगला गल्ला
  ‘पुष्पा 2’सिनेमाचा टीझर आणि पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलं आहे. पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता खूपच वाढली आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सिनेमाच्या हिंदी व्हर्जननं शंभर कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे सिनेमाचा दुसरा भाग देखील दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

  अभिनेता रणवीर सिंग याच्या कामाबद्दल सांगायचं तर त्याचा ‘सर्कस’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. आता रणवीर सिंग ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात आलिया भट्टसोबत दिसणार आहे.