मी तोच….‘बाजीराव मस्तानी’ च्या सेटवर आला भयानक अनुभव, ‘मला तिथे कोणी तरी असल्याचा भास झाला…’

रणवीर म्हणाला, याआधी मी कधीच आत्मा आणि भूत यावर विश्वास ठेवत नव्हतो. मात्र त्या दिवसापासून मी खूप घाबरलो होतो. माझ्यासाठी शूटिंगचे ते सर्वात कठीण दिवस होते.

    अभिनेता रणवीर सिंहला ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमानंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सिनेमातील रणवीरच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. हा सिनेमा रणवीरच्या करिअरमधील मैलाच दगड ठरला. या सिनेमात दीपिका पादूकोण मस्तानीच्या भूमिकेत झळकली होती. असं असलं तरी या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान मात्र रणवीरला काही न विसरता येण्यासारखे अनुभव आले आहेत. एका मुलाखतीत त्याने या अनुभवांविषयी खुलासा केला आहे.

    रणवीर सिंहने एका मुलाखतीत ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमाच्या सेटवर त्याला भूत दिसल्याचा दाव केला होता. यावेळी तो प्रचंड घाबरला असल्याचं देखील तो म्हणाला. शिवाय ते दुसरं तिसरं कुणी नसून बाजीराव पेशवे यांची आत्मा असल्याचं रणवीर म्हणाला.

    रणवीर म्हणाला, याआधी मी कधीच आत्मा आणि भूत यावर विश्वास ठेवत नव्हतो. मात्र त्या दिवसापासून मी खूप घाबरलो होतो. माझ्यासाठी शूटिंगचे ते सर्वात कठीण दिवस होते. सतत माझ्या आजुबाजूला कुणी तरी असल्याचं मला जाणवत होतं. ते बाजीराव असल्यासारखं मला जाणवतं होतं. मी सतत विचार करत होतो की जर मला खरचं बाजीराव पेशवे यांची आत्मा दिसला तर… मला माहित नाही मी असा विचार का करत होतो..पण काही दिवसातच हे प्रत्यक्षात घडलं. माझ्या कानात कुणीतरी मी तोच (बाजीराव) आहे असं कुजबुजल्याचं मला जाणवलं” असं रणवीर म्हणाला.

    एक दिवस सेटवर मला मोठा टास्क देण्यात आला होता. हा टास्क उत्तमपणे पार पडावा यासाठी मी प्रार्थना करत होतो. सेटवर तिथेच एक काळ्या रंगाची भिंत होती. या भिंतीवर पांढरी धूळ जमा झाल्याने एक विशिष्ट आकृती तयार झाली होती. तिच पगडी, तेच डोळे, मिश्या अगदी तोच रुबाब..ती हुबेहुब बाजीराव पेशव्यांची आकृती होती.” हा अनुभव सांगताना रणवीर म्हणाला की सेटवर त्याने ही आकृती अनेकांनी दाखवली सुद्धा. यावर अनेकांनी ती आकृती बाजीराव पेशव्यांसारखीच दिसत असल्याचं मान्य केलं होतं.