सार्बियाच्या जंगलातील आयुष्य उलगणार रणवीर; Ranveer Vs Wild मध्ये झळकणार बियर ग्रिल्ससोबत

Netflix वर प्रसारित होणाऱ्या या शोद्वारे रणवीरचे OTT वर पदार्पण होत आहे. बेअर ग्रिल्ससोबत शोच्या शूटिंगसाठी जुलै २०२१ मध्ये तो सर्बियाला गेला होता.

    एडवेंचर शोसाठी प्रसिद्ध असलेल्या बेअर ग्रिल्सच्या साहसी रिअॅलिटी शो ‘इनटू द वाइल्ड विथ बीअर ग्रिल्स’, (Into The Wild With Bear Grylls ) या शोमध्ये जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती जंगलच्या दुनियेची सैर करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता अक्षय कुमार, विकी कौशल, अजय देवगण, रजनिकांत या सेलिब्रिटींनी आतापर्यंत बेअर ग्रिल्सच्या शोमध्ये सहभागी होण्याचा मान पटकावलाय. आता या शोमध्ये रणवीर सिंगने  (Ranveer Singh) हजेरी लावली आहे. हा एपिसोड 8 जुलैला प्रसारित होणार आहे.

     

    ‘रणवीर Vs वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ या त्याच्या आगामी साहसी शोचा अधिकृत ट्रेलर शेयर करत करत याबाबत रणवीरने फॅन्सना माहिती दिली. ट्रेलर शेअर करताना, रणवीरने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर कॅप्शन दिले: “जंगल में मंगल! रणवीर VS वाइल्ड, रोमांचकारी साहसांनी भरलेला एक संवादी विशेष @netflix_in वर लवकरच येत आहे”

    रणवीर नुकताच जयेशभाई जोरदार या चित्रपटात दिसला होता. आता आगामी काळात सर्कस आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसणार आहे.