khyali saharan

कॉमेडियन ख्याली हा आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता आहे. एका महिलेला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने मानसरोवर परिसरातील एका हॉटेलच्या खोलीत दारुच्या नशेत त्याने बलात्कार केला, असा आरोप ख्यालीवर करण्यात आला आहे.

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन ख्याली सहारनच्या (Khyali Saharan) बाबतीतील एक मोठी बातमी समोर आली आहे. ख्याली सहारनवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जयपूरमधील (Jaipur Rape Case) हॉटेलच्या खोलीत 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप कॉमेडियन ख्यालीवर करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की, तरुणीच्या तक्रारीच्या आधारे मंगळवारी (14 मार्च) मानसरोवर पोलीस ठाण्यात ख्याली सहारनविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajesh Mahiya (@rajesh_mahiya1)

कॉमेडियन ख्याली हा आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता आहे. एका महिलेला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने मानसरोवर परिसरातील एका हॉटेलच्या खोलीत दारुच्या नशेत त्याने बलात्कार केला, असा आरोप ख्यालीवर करण्यात आला आहे. मानसरोवर पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षक संदीप यादव यांनी सांगितलं की, “तरुणीच्या तक्रारीनंतर ख्यालीविरुद्ध आयपीसी कलम 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस सध्या करत आहेत.” ही घटना 13 मार्चला घडली.

श्रीगंगानगर येथील रहिवासी असलेली ही महिला एका फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. एका महिन्यापूर्वी ती दुसऱ्या महिलेसोबत कामासाठी मदत मागण्यासाठी ख्यालीच्या संपर्कात आली होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपी कॉमेडियन ख्यालीने एका हॉटेलमध्ये दोन रुम बुक केल्या होत्या. एक खोली त्याने स्वत:साठी बुक केली होती आणि दुसरी दोन्ही महिलांसाठी. कथितपणे, तेव्हा ख्यालीने बिअर प्यायली आणि महिलांना बिअर पिण्यास भाग पाडले. नंतर एक महिला खोलीतून निघून गेली आणि ख्यालीने दुसऱ्या तरुणीवर बलात्कार केला.

आपने काय म्हटलं ?
आम आदमी प्रवक्ते योगेंद्र गुप्ता म्हणाले की, “आपचे लाखो कार्यकर्ते आहेत आणि त्यापैकी ख्याली आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतो ही वेगळी बाब आहे. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही.”

ख्यालीचा खुलासा
ग्रेट इंडियन चॅलेंज सीजन 2 मध्ये ख्यालीने सहभाग घेतला होता. या सीझनचा विजेता रौफ लाल हा ठरला होता. ‘द कपिल शर्मा शो’या शोमध्ये देखील ख्यालीने हजेरी लावली होती. ख्याली सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. ख्यालीने सांगितलं की, मी काहीही चुकीचं केलेलं नाही. ती महिला ब्लॅकमेलिंगसाठी सगळं करत आहे. नोकरीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आलेल्या तरुणीच्या सोबत आलेल्या मुलगी विचित्र वागत होती, तिला विरोध केल्यानंतर तुला बघून घेऊ अशी धमकी मला देण्यात आली. मी या ब्लॅकमेलिंग करणाऱ्या गँगविषयी पोलिसांकडे तक्रार केली आहे.