व्हायरल डीपफेक व्हिडीओवर रश्मिकानं व्यक्त केला संताप, सायबर पोलिसांना टॅग करत म्हणाली…

रश्मिकाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'माझा डीपफेक व्हिडिओ ऑनलाइन मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचे पाहून मला खूप दुःख झाले.

    अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा एक एडिट केलेला व्हिडिओ ( Rashmika Mandana fake video) कालपासून इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी हुबेहुब रश्मिका सारखी दिसत आहे. हा बोल्ड व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड संताप आहे. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी ही हा व्हिडिओ शेअर करत, कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. आता रश्मिकानेही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    काय म्हणाली रश्मिका?

    एआय तंत्रज्ञानाने बनवलेल्या या व्हिडिओवर रश्मिकाने स्पष्ट केले आहे की हा तिचा व्हिडिओ नाही. त्यांनी ट्विटरवर सायबर पोलिसांना टॅग करून स्पष्टीकरण दिले आहे. रश्मिका मंदान्नाचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो खरंतर युनायटेड किंगडमस्थित सामाजिक प्रभावशाली झारा पटेलचा आहे.

    रश्मिकाने व्यक्त केला संताप

    रश्मिकाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘माझा डीपफेक व्हिडिओ ऑनलाइन मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचे पाहून मला खूप दुःख झाले. याबद्दल बोलणे महत्त्वाचे आहे.’ हे केवळ माझ्यासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे, कारण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे. एक महिला आणि अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि हितचिंतक यांचे आभार मानते कारण ते माझे मार्गदर्शक आणि सपोर्ट सिस्टम आहेत. अशा घटनांना आणखी बरेच लोक बळी पडण्यापूर्वी समाज म्हणून आपण त्याचा निषेध केला पाहिजे.” अशा कृत्यांवर कारवाई करण्याची मागणीही अभिनेत्रीने केली आहे.

    व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कोण?

    इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओ रश्मिका असल्याचं दिसत आहे. काळ्या रंगाच्या डीप नेक टाइट जिम वेअरमध्ये ती लिफ्टच्या आत आल्याचे दिसत आहे. रश्मिकाचा हा बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते संतापले. वास्तविक व्हिडिओमध्ये ती रश्मिका नसून झारा पटेल नावाच्या मुलीचा आहे.