‘फोर्ब्स इंडियाकडून 30 अंडर 30’ यादी जाहीर, रश्मिका मंदानासह राधिका मदनचं नाव चमकलं!

27 वर्षांची रश्मिका मंदान्ना दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीपासून बॉलिवूडमध्ये चांगलीच गाजतेय तर राधिका मदननेही कमी वेळात सिनेसृष्टीत आपलं स्थान मिळवलंय.

  फोर्ब्स इंडिया मासिकाने वार्षिक ३० वर्षांखालील सेलिब्रिटींची यादी जाहीर ( Forbes 30 under 30) केली आहे. या यादीत विविध क्षेत्रातील ३० सेलेब्सचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांचे वय ३० वर्षांपेक्षा कमी आहे आणि जे येत्या काही वर्षांत नवीन विक्रम रचणार आहेत. या यादीत चित्रपटसृष्टीतील तीन अभिनेत्रींना स्थान मिळालं आहे. या यादीत स्थान मिळवणारी मनोरंजन उद्योगातील पहिली सेलिब्रिटी रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आहे. २७ वर्षीय रश्मिका ही दक्षिण भारतीय चित्रपटांची अभिनेत्री आहे आणि आता ती बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करत आहे. तर, राधिका मदनने (Radhika Madan) फोर्ब्सच्या ३० अंडर ३० च्या यादीत स्थान मिळवले आहे.

  फोर्ब्स इंडिया कडून मनोरंजन जगतासह Agritech, Art, B2B, क्लीन एनर्जी आणि क्लायमेट चेंज, कंझ्युमर टेक, डिझाईन, डिजिटल कंटेंट क्रिएटर, एज्युकेशन, ई-कॉमर्स आणि रिटेल, एंटरप्राइज टेक्नॉलॉजी, फॅशन, फायनान्स, फूड अँड हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर, इंडस्ट्री या क्षेत्रातील प्रतिभावान व्यक्तिंच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. मॅन्युफॅक्चरिंग, एनजीओ आणि सामाजिक उद्योजकता आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींनी आपले स्थान निर्माण केले आहे.

  रश्मिका मंदान्ना, मनोरंजन क्षेत्रातील पहिली सेलिब्रिटी

  गेल्या वर्षी त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. ती थलपथी विजयसोबत ‘वारिसु’ या तमिळ चित्रपटात दिसली, ज्याने जगभरात 300 कोटींची कमाई केली. त्यानंतर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘मिशन मजनू’ या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली होती. तिचा तिसरा चित्रपट ‘ॲनिमल’ रणबीर कपूरसोबत होता, ज्याची जगभरात कमाई 900 कोटींहून अधिक होती. तिचा पुढील चित्रपट अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा 2’ आहे, जो या वर्षी 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या वर्षी ती ‘रेनबो’, ‘द गर्लफ्रेंड’ आणि ‘छावा’मध्येही दिसणार आहे.

  राधिका मदनने 30 अंडर 30 मध्ये मिळवलं स्थान

  राधिका मदनने फोर्ब्सच्या ३० अंडर ३० च्या यादीत स्थान मिळवले आहे. 28 वर्षीय राधिका गेल्या वर्षी जिओ सिनेमावर रिलीज झालेल्या ‘कुट्टे’, ‘कच्चे लिंबू’ आणि ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’ या तीन चित्रपटांमध्ये दिसली होती. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘सना’ आणि ‘सरफिरा’चा समावेश आहे.

  गायक आणि संगीतकार डॉटचेही नाव यादीत

  या यादीत २५ वर्षीय आदिती सेहगल उर्फ ​​डॉट हिनेही स्थान मिळवले आहे. ती गायक आणि संगीतकार आहे. तिने गेल्या वर्षी दिग्दर्शिका झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.