
मुंबई : रात्रीस खेळ चाले या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कृतिका तुळसकर लग्नबंधनात अडकली आहे. कृतिका ने अपूर्व नेमळेकरनंतर मालिकेत शेवंता या पात्राची भूमिका केली होती. कृतिकाने सिने दिग्दर्शक विशाल देवरूखकर सोबत विवाह केला आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
१४ डिसेंबरला अभिनेत्रीचा विवाहसोहळा पार पडला असून विवाह अगदी मराठमोळ्या थाटात संपन्न झाला. कृतिकाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यापूर्वी तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे देखील डिसेंबर महिन्यात विवाह बंधनात अडकले होते.