
‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi)या चित्रपटातलं ‘टिप टिप बरसा पानी’ (Tip Tip Barsa Pani Song Remake)हे गाणं अक्षय कुमार आणि रवीना टंडनच्या ‘मोहरा’(Mohra) या चित्रपटातलं रिमेक गाणं आहे. नव्वदच्या दशकात हे प्रचंड लोकप्रिय गाणं. याच कारणामुळे नेटकरी गाण्याच्या रिमेकमध्ये असलेली कतरिना आणि ओरिजनल गाण्यामध्ये असलेली रवीना(Comparison Between Raveena And katrina) यांच्यामध्ये तुलना करत आहेत.
रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’(Sooryavanshi) चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करत आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar)आणि कतरिना कैफ (Katrina Kaif)या तगड्या स्टार्सच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या वीकेंडला ७७.०८ कोटींची कमाई करत शानदार कमबॅक केले. इतकेच नाही तर या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जगभरात १०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. अशात या चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’(Tip Tip Barsa Pani) या गाण्यातील कतरिनाचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. या गाण्यावर प्रेक्षक त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.
‘सूर्यवंशी’ या चित्रपटातलं ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं अक्षय कुमार आणि रवीना टंडनच्या ‘मोहरा’ या चित्रपटातलं रिमेक गाणं आहे. नव्वदच्या दशकात हे प्रचंड लोकप्रिय गाणं. याच कारणामुळे नेटकरी गाण्याच्या रिमेकमध्ये असलेली कतरिना आणि ओरिजनल गाण्यामध्ये असलेली रवीना यांच्यामध्ये तुलना करत आहेत.
रवीनाने हे गाणं पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती हे या गाण्याची कोरिओग्राफर फराह खानने सांगितलं आहे. हे गाणं पाहिल्यानंतर रवीनाने फराहला फोन केला आहे. ‘रवीना ही पहिली व्यक्ती होती, जिने मला फोन करून गाण्याचे कौतुक केले. ती म्हणाली की गाणं खूप चांगलं आहे आणि कतरिना खूप छान दिसत आहे,’ असे फराह म्हणाली.