‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्याच्यावेळी रविनाला मासिकपाळी असूनही ४ दिवस करावे लागले पावसात काम!

हे गाणं शूट होताना रविनांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रविना म्हणाली, हे गाणे एका कंस्ट्रक्शन साइटवर चार दिवस चित्रित करण्यात आलं...

    १९९४ साली आलेला मोहरा हा चित्रपट आजही लो

    कप्रिय आहे. त्यातलं ‘टिप टिप बरसा पाणी’ हे गाणं सुपरहिट झालं. एका मुलाखतीत रवीनाना तिला या गाण्याचे चित्रीकरण करताना कोणत्या अडचणी आल्या होत्या ते सांगितले आहे.

    हे गाणं शूट होताना रविनांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रविना म्हणाली, हे गाणे एका कंस्ट्रक्शन साइटवर चार दिवस चित्रित करण्यात आलं. आजूबाजूला दगड आणि खिळे पडलेले होते आणि तिला अनवाणी या गाण्यासाठी चित्रीकरण करायचे होते. माझ्या गुडघ्यांना दुखापत झाली होती आणि आणखी वाईट गोष्ट म्हणजे मला मासिक पाळी आली होती.

    तर हे गाणं चित्रित करण्याआधी रवीनाला १०२ ताप देखील होता. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी कृत्रिम पाऊस करण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी टॅंकर मागवले होते आणि ते पाणी थंड होतं. दरम्यान, १०२ ताप असून ही रवीनाला ४ दिवस गाण्याचे चित्रीकरण करावे लागले.

    ‘मोहरा’ चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. हे गाणं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलं आहे. तर, या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनमध्ये अक्षय आणि कतरिना कैफ दिसणार आहेत. ‘टिप टिप बरसा पाणी’चं रिमिक्स व्हर्जन हे त्यांचा आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’ मध्ये दिसणार आहे.