Raya Krushna in man jhale bajinde

‘मन झालं बाजिंद’ (Man Jhala Bajind)या मालिकेत राया आणि कृष्णा कोकणात(Raya And Krishna Honeymoon) एका ठिकाणी हनिमूनसाठी रवाना होतात. या सर्व गोष्टींमुळं नकळत का होईना दोघांमधील नवरा-बायकोचं नातं खुलताना दिसतंय, राया आणि कृष्णामधील दुरावा अखेर संपून प्रेमाचं नातं बहरेल का? हे आगामी भागात पाहायला मिळेल.

    ‘मन झालं बाजिंद’ (Man Jhala Bajind)या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत(Raya And Krishna Love Story) पिवळ्या रंगाची उधळण पाहायला मिळत आहे. परंपरागत व्यवसायाला स्वतःकडील व्यवहार ज्ञानानं भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, असा आपला बाजिंदा नायक राया यात आहे. मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणाऱ्या कृष्णाच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट आहे.

    राया आणि कृष्णा एकमेकांना आपल्या आयुष्यभराच्या जोडीदाराच्या रूपात बघत नाहीत, पण रायाच्या पत्रिकेत दोष असल्यामुळं त्याची पहिली बायको ही अल्पायुषी असेल असं भाकीत गुरुजींनी केलं. त्यामुळं गुलीमावशी राया आणि कृष्णाचं लग्न लावण्यासाठी मामाला भरीस पाडते आणि दोघांच लग्न होतं. राया आणि कृष्णाच्या गाडीला अपघात झाल्यावर, बेशुद्ध कृष्णाला राया स्वतः श्वास देऊन वाचवतो.

    man jhale bajinde raya krushna

    भाऊसाहेब आणि फुई, राया आणि कृष्णाच्या हनिमूनचा प्लॅन आखतात. राया आणि कृष्णा कोकणात(Raya And Krishna Honeymoon) एका ठिकाणी हनिमूनसाठी रवाना होतात. या सर्व गोष्टींमुळं नकळत का होईना दोघांमधील नवरा-बायकोचं नातं खुलताना दिसतंय, राया आणि कृष्णामधील दुरावा अखेर संपून प्रेमाचं नातं बहरेल का? हे आगामी भागात पाहायला मिळेल.