‘एकदा नातं जुळलं की’…प्रेमाच्या प्रश्नावर रेखाने दिलं हृदयस्पर्शी उत्तर, तुम्हीही ऐकून पडाल प्रेमात

रेखाच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी रेखाचे सौंदर्य नवनवीन नायिकांना मात देत आहे. एका मॅगझिनच्या मुलाखत दिली आहे ज्यामध्ये रेखाने प्रेमाविषयी विधान केलंय.

  जेष्ठ अभिनेत्री रेखा (Rekha)  सोशल मिडियावर फार सक्रिय नसतात. पण त्यांच्या कामाची आणि त्यांच्या सौंदर्याची कायमच चर्चा होते. त्यांना प्रेमाबद्दल बोललेलं फार क्वचितच आपण पाहिलं असेल. पण नुकतचं रेखा यांनी एका मॅगझिनसाठी खास फोटोशूट केलं. जे पाहिल्यावर रेखा यांच्या वयाचा अंदाजही लावणं कठीण होऊन बसलंय. यावेळी एका मुलाखती दरम्यान त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यातील एक प्रश्न प्रेमावरही होता. प्रेमाच्या या प्रश्नाला रेखाने सुंदर उत्तर देत त्याला आपल्या कलेची जोड दिली. प्रेमाबद्दल त्या नेमंक काय म्हणाल्या बघूया.

  मी नशीबवान आहे

  रेखा यांनी वोग अरेबियाला या मॅगझीनसाठी केलेलं फोटोशूट सध्या चांगलच व्हायरल होत आहे. यावेळी संवाद साधताना त्यांनी अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. 2014 पासून कोणताही प्रोजेक्ट करत नसल्याबद्दल त्या म्हणाल्या की, मी चित्रपट करू किंवा न करू, ती माझ्यापासून कधीच विभक्त होत नाही. मला आवडलेल्या गोष्टीला पुन्हा जिवंत करण्याच्या अनेक आठवणी आहेत. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा योग्य गोष्ट मला मिळेल.  माझी सिनेमॅटिक व्यक्तिरेखा पाहणाऱ्यांच्या नजरेत आहे. त्यामुळे मी कुठे असावे आणि कुठे नसावे हे मी ठरवते. मी खूप भाग्यवान आहे की मला जे हवे आहे ते निवडण्याचा अधिकार मला मिळाला.

  प्रेम कधीच संपत नाही

  रेखा यांना प्रेमाबाबतही विचारण्यात आलं. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्यावर खूप प्रेम करतो तेव्हा प्रेम नाहीसे होते का? याला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, नाही, एकदा नातं तयार झालं की ते कायमचं असतं. कधीकधी आपल्याला यापेक्षा जास्त हवे असते तर कधी इतके पुरेसे असते. हीच गोष्ट माझ्या कलेलाही लागू पडते.

  नक्कीच, माझा जन्म अभिनयासाठी झाला आहे…नकारात्मकतेने नव्हे तर सकारात्मकतेने सौंदर्य आत्मसात करण्याची माझी इच्छा आहे, ज्यामुळे मला माझ्या कलेवर प्रभुत्व मिळते. मला रोजचा दिवस नवीन वाटतो. आणि जे माझ्याप्रमाणे वचनबद्धता दाखवतात त्यांच्यावर माझा विश्वास आहे.”