प्रख्यात संतूरवादक पंडित सतीश व्यास यांना मध्य प्रदेश सरकारचा प्रतिष्ठेचा तानसेन संगीत पुरस्कार प्रदान

प्रख्यात संतूरवादक पंडित सतीश व्यास यांना मध्य प्रदेश सरकारचा प्रतिष्ठेचा तानसेन संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. २ लाख रुपये रोख, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शनिवारी २६ डिसेंबरपासून ग्वाल्हेर येथे सुरु होणाऱ्याझालेल्या पाच दिवसांच्या तानसेन संगीत सोहळ्यामध्ये या पुरस्काराचे वितरणपहिल्याच दिवशी करण्यात आले. मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री श्रीमती ऊषा ठाकूर आणि ऊर्जामंत्री श्री प्रदुमन सिंग तोमर यांच्या हस्ते श्री सतीश व्यास यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रख्यात संतूरवादक पंडित सतीश व्यास यांना मध्य प्रदेश सरकारचा प्रतिष्ठेचा तानसेन संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. २ लाख रुपये रोख, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शनिवारी २६ डिसेंबरपासून ग्वाल्हेर येथे सुरु होणाऱ्याझालेल्या पाच दिवसांच्या तानसेन संगीत सोहळ्यामध्ये या पुरस्काराचे वितरणपहिल्याच दिवशी करण्यात आले. मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री श्रीमती ऊषा ठाकूर आणि ऊर्जामंत्री श्री प्रदुमन सिंग तोमर यांच्या हस्ते श्री सतीश व्यास यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक संचालनालायातर्फे या पुरस्कारांचे वितरण केले जाते. या पुरस्काराबरोबरच राष्ट्रीय राजा मानसिंग तोमर या संगीत क्षेत्रातील संस्थेला देण्यात येणारा पुरस्कार यंदा भोपाळ येथील अभिनव कला परिषद संस्था या संस्थेला प्रदान करण्यात आला. या पुरस्कार निवड समितीवर आघाडीचे संगीत कलाकार व तज्ञहोते आणि त्यांमध्ये शोभा चौधरी, कल्पना झोकरकर, बळवंत पुराणिक, राजीव वर्मा, अभिषेक निगम, रासबिहारी शरण या मान्यवरांचा समावेश होता. पाच दिवसांच्या तानसेन संगीत समारोहमध्ये देशविदेशातील आघाडीचे संगीत कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांत पंडित सतीश व्यास त्यांचाही समावेश होता.

“तानसेन सन्मानाने गौरविले गेलेले पंडित सतीश व्यास हे यशस्वी संगीतकर्मी असून त्यांच्या घराला संगीताचा थोर वारसा आहे. त्यांचे वडील पंडित सीआर व्यास हे एक प्रज्ञावान शास्त्रीय संगीत गायक होते आणि त्यांनाही १९९९ मध्ये याच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. देश आणि विदेशातील अनेक प्रतिष्ठीत संगीत सामारोहांमध्ये त्यांनी संतूरवादन केले आहे,” अशा शब्दांमध्ये मध्य प्रदेश सरकारच्या संगीत संचालनालयाने त्यांचा गौरव केला आहे.

या पुरस्काराबद्दल बोलताना पंडित व्यास म्हणाले कि, तानसेन पुरस्कार मिळणे ही कोणत्याही कलाकारासाठीस सर्वात मोठा बहुमान असतो. ते म्हणाले की, त्यांच्यासाठी हा आनंद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासमोर त्यांनी केलेल्या कार्यक्रमापेक्षाही मोठा आहे. “मध्य प्रदेश सरकारचा अत्यंत प्रतिष्ठेचा तानसेन पुरस्कार २६ डिसेंबर २०२० रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते मला प्रदान करण्यात आला. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मानआहे. माझे ऋषितुल्य गुरू पंडित शिवकुमार शर्मा आणि माझे पालक पंडित दिवंगत सी आर व्यास व श्रीमती इंदिरा व्यास यांच्या आशीर्वादाने हा पुरस्कार मला मिळत आहे, असे मी मानतो. मी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासमोरही संतूरवादन केले आहे. पण आजच्या या पुरस्काराने त्यापेक्षाही अधिक आनंद मला दिला आहे,” ते म्हणाले.

पंडित सतीश व्यास यांनी प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्याकडून संतूरवादनातील धडे गिरवले आहेत. त्याशिवाय प्रख्यात शास्त्रीय संगीत गायक आणि त्यांचे वडील पंडित सी आर व्यास यांच्याकडूनही त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. २००३ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय त्यांना २०१०मध्ये कुमार गंधर्व राष्ट्रीय सन्मान पुरस्कारानेही गौरविण्यात आले. व्यास यांनी अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यांसारख्या देशांमध्ये प्रतिष्ठीत संगीत समारंभांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांना अमेरिकन सरकारने मानद नागरिकत्व प्रदान केले आहे. २०१९ मध्ये त्यांनी कॅनडा येथील टोरोंटोमधील आगा खान वास्तुसंग्रहालयात संतूरवादन केले आहे.

“परंतु आजही मी स्वतःला संगीतातील एक विद्यार्थी समजतो. वाढत्या अनुभवाबरोबर आणि वयाबरोबर संगीतातील साधना मात्र वाढत जाते. संपूर्ण जगात आणि भारतातील छोट्या छोट्या गावांमध्ये व शहरांमध्ये संतूरचा प्रसार करण्याचा विडा मी उचलला आहे. त्यामुळे मला अगदी छोट्या छोट्या शहरांतूनही संतूरवादनासाठी निमंत्रण आले तरी मी तेथे आनंदाने कार्यक्रमासाठी जातो,” असेही व्यास यांनी पुढे म्हटले.