sukh mhanje nakki kay aste retro look

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Aste)या मालिकेमध्ये माई आणि दादांच्या इच्छेखातर पुन्हा एकदा जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा (Jaydeep And Gauri Marriage) घाट घालण्यात आला आहे. प्री वेडिंग फोटोशूटसाठी जयदीप-गौरीसह संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबानं रेट्रो लूकला(Retro Look In Sukh Mhanje Nakki Kay Aste) पसंती दिली आहे.

  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Aste)या मालिकेमध्ये लवकरच जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा(Jaydeep And Gauri Marriage) थाट पाहायला मिळणार आहे. माई आणि दादांच्या इच्छेखातर पुन्हा एकदा लग्नाचा घाट घालण्यात आला आहे. शिर्केपाटील कुटुंबात(Shirke Patil Family) एखादा सण-समारंभ असो वा कोणतंही शुभकार्य ते थाटातच पार पडतं. त्यामुळं जयदीप-गौरीचं लग्नही अगदी थाटात पार पडणार आहे. प्री वेडिंग फोटोशूटपासून, मेहंदी, हळद, वरात आणि लग्नाचा शाही थाट पाहायला मिळेल.

  sukh mhanje nakki kay aste jaydeep gauri retro look

  लग्नात जयदीप गौरीचा लूक नेमका कसा असणार याची उत्सुकता आहे. प्री वेडिंग फोटोशूटसाठी जयदीप-गौरीसह संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबानं रेट्रो लूकला(Retro Look In Sukh Mhanje Nakki Kay Aste) पसंती दिली आहे.

  sukh mhanje nakki kay aste uday devki retro look

  जयदीप-गौरी काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्या रुपात दिसणार आहेत, तर उदय आणि देवकी दिसतील दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या रुपात. शेखर-रेणुकेने अशोक सराफ आणि रंजना यांच्यासारखा लूक केलाय, तर मल्हार बनलाय दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे.

  sukh mhanje nakki kay aste shekhar and renuka retro look

  माई आणि दादा यांनी सुद्धा ७०च्या दशकातला लूक धारण केला आहे, तर अम्मा दिसणार आहे ललिता पवार यांच्या रुपात. संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब या लग्नाच्या निमित्तानं हटके अंदाजात दिसणार आहे.