रियाचा भाऊ शौविक, सॅम्युएल मिरांडा एनसीबीच्या ताब्यात

सुशांतचा मॅनेजर सॅम्यूअल मिरांडाला (Samuel Miranda) एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. जवळपास अडीच तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने त्याला ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे एनसीबीकडून रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) मुंबईतील घरावरही धाड टाकण्यात आली आहे. तसेच आता रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला (Shauvik)  सुद्धा एनसीबीने ताब्यात घेतले आहे.

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबीने (Narcotics Control Bureau) मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरूवात केली आहे. एनसीबीने सकाळी सॅम्यूअल मिरांडाच्या घरावर धाड टाकली होती. त्यानंतर सुशांतचा मॅनेजर सॅम्यूअल मिरांडाला (Samuel Miranda) एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. जवळपास अडीच तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने त्याला ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे एनसीबीकडून रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) मुंबईतील घरावरही धाड टाकण्यात आली आहे. तसेच आता रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला (Shauvik)  सुद्धा एनसीबीने ताब्यात घेतले आहे.

 सॅम्युएल मिरांडानंतर शौविकला सुद्धा एनसीबीने ताब्य़ात घेतलं असून दोघांचीही समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे.

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड तसंच मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा विकणाऱ्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे.