अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी रिहाना भारतात दाखल; अंबानींकडून विमानतळावर ग्रँड वेलकम!

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला धमाकेदार सुरुवात झाली आहे. या दिमाखदार सोहळ्यात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक मोठे स्टार्स सहभागी होणार आहेत.

  सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे अंनत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची. हे सेलेब्रिटी कपल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अंनत आणि राधिकाचं येत्या दोन दिवसात लग्न आहे. त्यांच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शनला गुजरातच्या जामनगर (Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Function) धमाकेदार सुरुवात झाली आहे. या दिमाखदार सोहळ्यात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक मोठे स्टार्स सहभागी होणार आहेत. अनेक सेलिब्रेटींनी आता जामनगरमध्ये येण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकन पॉप सिंगर रिहाना (Pop Singer Rihanna) ही आपल्या टीमसोबत जामनगरमध्ये  (Rihanna At Jamnagar)  दाखल झाली आहे.ती विमानतळावर येताच अंबानी कुटुंबाकडुन तिचं ग्रँड वेलकम करण्यात आलं.

   पॉप सिंगर रिहाना जामनगरमध्ये दाखल

  अंनत आणि राधिकाच्या लग्नात हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहानाची परफार्म करणार आहे. यासाठी रिहान तिच्या टिमसह गुरुवारी जामनगरला आली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रिहानाची संपूर्ण टीम एअरपोर्टमधून बाहेर पडताना दिसत आहे.

  अंबानींकडून रिहानाच्या टीमचे ग्रँड वेलकम

  जामनगरला पोहोचल्यानंतर सर्व पाहुण्यांचे अंबानी कुटुंबीयांकडून जोरदार स्वागत केले जात आहे. हे पाहुणे त्यांच्या स्वागताने भारावले असून प्रत्येत क्षण मोबाईलमध्ये कैद करताना दिसत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

  अनेक सेलेब्रिटीगी जामनगरमध्ये दाखल

  1 मार्च ते 3 मार्चदरम्यान अंनत आणि राधिकाच्या लग्नाचे प्री वेडिंगचे फंक्शन होणार आहेत. या कार्यक्रमात जगभरातील सेलिब्रिटी सहभागी होत आहेत. रिपोर्टनुसार, सलमान खान, अभिषेक बच्चन, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर यांसारखे अनेक कलाकार या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवणार आहेत. आता नुकतच रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलियासह (Aalia Bhat) लेक राहा देखील या कार्यक्रमांसाठी पोहचली आहे.