unpaused trailer

रिंकू राजगुरु एका नव्या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘अनपॉज’(Unpaused) असे आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरुने(rinku rajguru) आपल्या पदार्पणातच ‘सैराट’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. रिंकू राजगुरु आता एका नव्या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘अनपॉज’(Unpaused) असे आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

अनपॉजचा ट्रेलर बघून जाणवते की, या चित्रपटामध्ये पाच वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म दाखवण्यात आल्या आहेत. यामध्ये रिंकू राजगूरु वेगळ्या अंदाजात दिसत आहे. रिंकू राजगुरु तिच्यासोबत लिलिट दुबेदेखील अभिनय करताना दिसणार आहे.

राज अँड डीके, निखील अडवाणी, तनिष्ठा चॅटर्जी, अविनाश अरूण आणि नित्या मेहरा अशा पाच दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या शॉर्ट फिल्म्स या चित्रपटात दाखवल्या जाणार आहेत. हा चित्रपट १८ डिसेंबर रोजी ॲमेझॉन पाईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.