rishabh shetty on kantara

  अभिनेता ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) चित्रपट ‘कांतारा’ (Kantara) अजूनही बॉक्स ऑफीसमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने ४०० कोटींचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट २४ नोव्हेंबरपासून अमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. मात्र अजुनही चित्रपटगृहात या चित्रपटाची जादू कायम आहे. अशातच ऋषभ शेट्टीने (Rishab Shetty On Kantara) मोठा खुलासा केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by IMDb India (@imdb_in)

  ‘कांतारा’ चित्रपटाची कथा कर्नाटकातल्या किनारपट्टीच्या भागात घडणारी आहे. जिथे लोक जुन्या कथांवर खूप विश्वास ठेवतात. चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या सीनमध्ये गावातले लोक आणि व्हिलन यांच्यातली भांडणं दाखवण्यात आली आहेत. या क्लायमॅक्सच्या सीनसंदर्भात ऋषभ शेट्टीने आपला अनुभव शेअर केला आहे.

  एका मुलाखतीत ऋषभ शेट्टी म्हणाला की, क्लायमॅक्समध्ये माझा आणि माधवाचारीच्या मारामारीचा रात्रीचा सीन आहे. त्यावेळी आम्ही दुपारपासून संध्याकाळपर्यंत त्या सीनचा फक्त सराव करत असायचो. त्या फाईट सीनसाठी आम्ही रात्रीच्या वेळी सिंगल शॉट किंवा ३६० डिग्रीमध्ये पावसाच्या इफेक्टसह शॉट शूट करत होतो.  आम्ही जिथे शूटींग करत होतो त्या ठिकाणी पाणी आणणंही खूप अवघड होतं. त्या ६,७ दिवसांमध्ये आम्ही जवळच्या गावातल्या लोकांना विहीरीतून पाणी आणून काम करत होतो. मात्र आमचं शूटींग संपेपर्यंत त्या विहीरीमधलं पाणीसुद्धा संपलं होतं.  त्या परिस्थितीमध्ये पूर्ण रात्रभर तिथे शूटींग करणं खूप हेक्टीक होतं. खूप वेगळ्या तंत्राचा वापर करत होतो. त्याच काळात अचानक माझ्या खांदेदुखीला सुरुवात झाली. त्या ३६० डिग्री शॉटमध्ये माझ्या एका खांद्याचं हाड सरकलं होतं. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या खांद्याचं हाडही सरकलं. दोन्ही खांद्याची हाडं सरकलेली असतानाही मी शूटींग सुरु ठेवलं.