अभिनेता रितेश देशमुखनं अयोध्येतील राम मंदिराला दिली भेट, पत्नी जेनेलिया आणि मुलांसह रामलल्लाचं घेतलं दर्शन!

त्यांच्या अयोध्या भेटीचे फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकांऊटवर शेअर केले आहे. यावेळी त्यांची मुलंही त्यांच्या सोबत होती. हे फोटो पाहून नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

  अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा (Genelia DSouza) हे बॅालिवूडमधील आवडतं कपल आहे. हे दोघही सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतात. नेहमी एकमेकांसोबतचे फोटो व्हिडिओ शेअर करतात. आता रितेश आणि जेनेलिया त्यांनी नुकतचं अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली. त्यांच्या अयोध्या भेटीचे फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकांऊटवर शेअर केले आहे. यावेळी त्यांची मुलंही त्यांच्या सोबत होती. हे फोटो पाहून नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

  जेव्हापासून राम मंदिर लोकांसाठी खुले करण्यात आले तेव्हापासून आम्ही अनेक सेलिब्रिटींना मंदिरात भेट देताना पाहण्यात आले आहे. यामध्ये बॉलीवूड स्टार्सपासून ते दाक्षिणात्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. परदेशात राहणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राने भारतात आल्यानंतर पती आणि मुलीसह रामल्लाचं आवर्जून दर्शन केलं होतं. आता नुकतचं भिनेता रितेश देशमुख त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा आणि त्याची दोन मुले रियान आणि राहिल यांच्यासह अयोध्या येथील राम मंदिराला भेट देताना दिसला.

  रितेशने इंस्टाग्रामवर प्रभू रामासमोर प्रार्थना करताना आपल्या कुटुंबाचा फोटो पोस्ट केला आहे. त्याने फोटो पोस्ट करत कॅप्शन दिले, “मंत्रों से बढके तेरा नाम…जय श्री राम!!! #ramlalla चे छान दर्शन घेऊन धन्य झालो!!’ हा फोटो पोस्ट केल्यानंतर लगेचच तो फोटो व्हायरल झाला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)


  या फोटोत रितेश पिवळा कुर्ता परिधान केलेला दिसतो तर त्याची पत्नी पांढरा सूट परिधान केलेली दिसत आहे. तर रितेश अयोध्येतील राम मंदिराच्या पुजाऱ्याकडून आशीर्वाद घेताना दिसत आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याला पवित्र स्थळी भेट देताना पाहून चाहत्यांना आनंद  द्विगुणीत झाला आहे.

  रितेश आणि त्याच्या कुटुंबीयांना मंदिरात पाहून मंदिरात उपस्थित असलेल्या चाहत्यांना आनंद आणि जल्लोष झाला. रिपोर्टनुसार, मंदिरात उपस्थित असलेल्या चाहत्यांनी बॉलिवूड अभिनेता आणि त्याच्या कुटुंबाला पाहताच जय श्री रामचा नारा दिला.

  रितेशचं व्रकफ्रंट

  रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो तीन चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. या चित्रपटांमध्ये Raid 2, Kakuda आणि Visphot यांचा समावेश आहे. मागच्या वर्षी त्याचा वेड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात रितेश आणि जेनेलियाच्या केमेस्ट्रीला प्रेक्षकांनी पुन्हा एकदा पंसती दिली. या चित्रपटानं बॅाक्स ऑफिसवर 75 कोटींचा व्यवसाय केला होता.