
रितेश देशमुखची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसोझा देशमुख (Genelia Deshmukh) हिने तिचा मुलगा रिआन याच्या बर्थ डे पार्टीतील एक व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या पार्टीत रितेश देशमुख बच्चे कंपनी सह एक बॉलिवूड गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसला.
मुंबई : बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याचा ‘वेड’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या या चित्रपटाचे नवीन गाणे ‘वेड तुझा’ आणि या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अशातच आता अभिनेता रितेश देशमुख याचा एक भन्नाट डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
रितेश देशमुखची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसोझा देशमुख (Genelia Deshmukh) हिने तिचा मुलगा रिआन याच्या बर्थ डे पार्टीतील एक व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. रितेश जिनिलियाचा मुलगा रिआन देशमुख याचा २५ नोव्हेंबर रोजी ८ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी रितेश जिनिलियाने त्याच्या मित्र परिवारासह बच्चे कंपनीसाठी विंटर कार्निवलचे आयोजन केले होते. या पार्टीत रितेश देशमुख बच्चे कंपनी सह एक बॉलिवूड गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसला.