ved broke sairat record

रविवारी (Ved Sunday Collection) एका दिवसात ‘वेड’ चित्रपटाने 5.70 कोटी इतकी कमाई केली आहे. या आकड्यामुळे ‘वेड’ ने ‘सैराट’ चित्रपटाचा (Ved Movie Broke Sairat Collection Record) एका दिवसातल्या कमाईचा रेकॉर्ड मोडला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत साधारण 33 कोटींचा गल्ला जमवल्याची माहिती मिळाली आहे.

    रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि जिनिलीया देशमुखच्या (Genelia Deshmukh) ‘वेड’ (Ved) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुव्वा उडवला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटून गेला आहे. तरीही या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर कायम आहे. जिनिलीयाने ‘वेड’ या चित्रपटातून मराठीमध्ये पदार्पण केलं तर रितेशचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाने रविवारी एक वेगळाच रेकॉर्ड केला आहे. रविवारी (Ved Sunday Collection) एका दिवसात ‘वेड’ चित्रपटाने 5.70 कोटी इतकी कमाई केली आहे. या आकड्यामुळे ‘वेड’ ने ‘सैराट’ चित्रपटाचा (Ved Movie Broke Sairat Collection Record) एका दिवसातल्या कमाईचा रेकॉर्ड मोडला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत साधारण 33 कोटींचा गल्ला जमवल्याची माहिती मिळाली आहे.

    आठवड्याभरामध्ये या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. रणवीर सिंगच्या ‘सर्कस’लासुद्धा या चित्रपटाने आठवड्याभरात मागे टाकलं आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 2 कोटी 25 लाख रुपये कमवले. तर दुसऱ्या दिवशी 3 कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी रविवारी 4 कोटी 50 लाख तर सोमवारी 3 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले. चित्रपटाची नवव्या दिवसाची कमाई पाहून तर अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. पहिल्या दिवसाच्या तब्बल दुप्पट कमाई या चित्रपटाने नवव्या दिवशी केली आहे. ‘वेड’ चित्रपट आणखी कोणते रेकॉर्ड मोडणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना आहे.

    ‘मजिली’ या चित्रपटाचा रिमेक असूनही हा चित्रपट लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. ‘वेड’ची जादू इन्स्टाग्रामवरदेखील दिसून येत आहे. ‌‘वेड लावलंय’ या गाण्यावर लोक रिल्स बनवत आहेत. रितेश आणि जिनिलियाचे चाहते या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत.चित्रपटातील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक प्रेम करत आहेत. रितेशचा दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा असूनही यात फार उणीवा जाणवत नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. जिनिलियानेही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करुन आणि एका वेगळ्या ‌व्यक्तिरेखेला साकारून लोकांची मनं जिंकली आहेत.