
रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. करण जोहरने बॉलिवूडमध्ये 25 वर्ष पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने हे पोस्टर रिलीज करण्यात आलं.
Poster Release : रणवीर सिंग (Ranvir Singh) आणि आलिया भट्टच्या (Alia bhatt) आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky aur rani ki prem kahani) चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. करण जोहरने बॉलिवूडमध्ये 25 वर्ष पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने हे पोस्टर रिलीज करण्यात आलं. सोशल मीडियावर आलिया आणि रणवीरने पोस्टर पोस्ट केली आहे. करण जोहर दिग्दर्शक म्हणून कमबॅक करणार आहे.
View this post on Instagram
रणवीरने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. रणवीरने स्वत:च्या व्यक्तिरेखेची ओळख करून देत त्याने पोस्ट केलं आहे, “यारों का यार और दिलों का दिलदार- रॉकी!”
View this post on Instagram
तर आलियाने तिच्या पात्राची ओळख करून देत पोस्ट केले आहे की, “राणीला भेटा,” असं कॅप्शन दिलं आहे. तर रणवीर पुढे म्हणालाय, “रॉकी के दिल की रानी.” आलिया देसी लूकमध्ये दिसत आहे, तर रणवीर पूर्ण वेस्टर्न लूकमध्ये आहे. करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया दुसऱ्यांदा एकत्र दिसणार आहे.
View this post on Instagram
चाहत्यांना त्यांच्या पात्रांची ओळख करून दिल्यानंतर, अभिनेत्यांनी त्यांच्या सिनेमाची झलक दाखवणाऱ्या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे. #RockyAurRaniKiiPremKahaani, करण जोहरचा त्याच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त एक सिनेमा. 28 जुलै 2023 रोजी थिएटरमध्ये,” असं पोस्टला कॅप्शन दिले.
या व्हॅलेंटाईन डेला हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र, शूटिंग पूर्ण न झाल्याने हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला.
इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिलेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.