santaji Dhanaji

‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’(Swarajya Saudamini Tararani)या मालिकेत या दोन धुरंधर सेनानींची गोष्ट पाहायला मिळणार आहे. अमित देशमुख(Amit Deshmukh) आणि रोहित देशमुख(Rohit Deshmukh) हे दोघे संताजी आणि धनाजी यांची भूमिका साकारत आहेत. यासाठी त्यांच्या घोडेस्वारी, दांडपट्टा, तलवारबाजी अशा मर्दानी खेळांच्या तालमी सुरू आहेत. १५ नोव्हेंबरपासून ही मालिका सुरू होणार आहे.

    औरंगजेबाची कबर खोदणाऱ्या रणरागिणी ताराराणीची गाथा ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’(Swarajya Saudamini Tararani) या मालिकेतून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ताराराणींनी स्वराज्याची धुरा समर्थपणे सांभाळली आणि स्वराज्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेला. ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करण्याची अवघड कामगिरी शिरावर घेऊन ती फत्ते केली मराठ्यांच्या दोन शूर सेनानींनी, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी. एक वाघ तर दुसरा सिंह.

    चारही दिशांना विखुरलेलं अवघं मराठी लष्कर या दोन सेनानींच्या नेतृत्वाखाली आणि ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी वेळेत एकवटलं आणि मराठी साम्राज्यात दैदीप्यमान इतिहास घडला. संताजी आणि धनाजी यांची मोगल सैन्यावर इतकी दहशत होती की, मोगली घोडे मराठी मुलखाचं पाणी प्यायला बिचकू लागले. तुम्हाला पाण्यात काय संताजी-धनाजी दिसतात का… असे मोगल सेनापती आपल्या घोड्यांना विचारू लागले.

    ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत या दोन धुरंधर सेनानींची गोष्ट पाहायला मिळणार आहे. अमित देशमुख आणि रोहित देशमुख हे दोघे संताजी आणि धनाजी यांची भूमिका साकारत आहेत. यासाठी त्यांच्या घोडेस्वारी, दांडपट्टा, तलवारबाजी अशा मर्दानी खेळांच्या तालमी सुरू आहेत. १५ नोव्हेंबरपासून ही मालिका सुरू होणार आहे.