Rohit Purohit

‘धडकन जिंदगी की’(Dhadkan Zindagi Ki) ही मालिका वैद्यकीय विश्वातील कथानकातून डॉ. दीपिकाच(Doctor Dipika) प्रेरणादायक कथानक सादर करणार आहे. डॉ. दीपिकाच्या प्रवासातील एक मोठं आव्हान म्हणजे डॉ. विक्रांत ही व्यक्तिरेखा असणार आहे. रोहित पुरोहित(Rohit Purohit In Doctor Vikrants Role) ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

    साचेबंद कथानकांना आव्हान देत ६ डिसेंबरपासून सुरू होणारी ‘धडकन जिंदगी की’(Dhadkan Zindagi Ki) ही मालिका वैद्यकीय विश्वातील कथानकातून डॉ. दीपिकाच(Doctor Dipika) प्रेरणादायक कथानक सादर करणार आहे. दीपिका एक स्वतंत्र विचारांची स्त्री असून, स्वप्नं साकार करण्यासाठी ती आपल्या कुटुंबातील, समाजातील आणि कार्यस्थळी रुजलेल्या पुरुषप्रधानतेला आव्हान देते. डॉ. दीपिकाच्या प्रवासातील एक मोठं आव्हान म्हणजे डॉ. विक्रांत ही व्यक्तिरेखा असणार आहे. रोहित पुरोहित(Rohit Purohit In Doctor Vikrants Role) ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मॉडेलिंगकडून अभिनयाकडं वळलेला रोहित दोन वर्षांनी टेलिव्हिजनच्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. यावेळी तो जी व्यक्तिरेखा साकारणार आहे, त्यात अनेक कंगोरे आहेत.

    आपल्या भूमिकेबद्दल रोहित म्हणाला की, डॉ. विक्रांत एक महत्त्वाकांक्षी माणूस आहे. त्याला सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणात ठेवायला आवडतात. अत्यंत पुरुषप्रधान अशा कुटुंबात वाढलेल्या विक्रांतला वाटतं की, स्त्रियांनी आपली महत्त्वाकांक्षा किंवा कारकीर्द जोपासण्यापेक्षा आपल्या कुटुंबाकडेच लक्ष दिलं पाहिजे. विक्रांतची भूमिका करणं हा एक आव्हानात्मक अनुभव आहे. कारण या व्यक्तिरेखेत अनेक पदर आहेत. मी या आधी केलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूप वेगळी आणि अधिक गहिरी आहे. काही बाबतीत या व्यक्तिरेखेचे माझ्याशी साम्य आहे, विशेषतः भरपूर कष्ट करण्याची तयारी आणि यशाची शिडी चढण्याची त्याची जिद्द. पण त्याच्यातला पुरुषी अहंकार हा माझ्यात नाही.