rrr ntr and ramcharan

ब्रिटिश फिल्म इन्स्टीट्यूटमधील साइट अँड साऊंड मॅगजीन दरवर्षी वर्षभरातील सर्वोत्कृष्ट ५० सिनेमांची यादी जाहीर करतात. या यादीत स्कॉटिश सिने दिग्दर्शक चोर्लोट वेल्स दिग्दर्शित ‘आफ्टर सन’ या सिनेमाने बाजी मारली आहे. हा सिनेमा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

    ‘आरआरआर’ (RRR) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून कायम चर्चेत राहिला आहे. या सिनेमाची क्रेझ अजुनही कमी झालेली नाही. एस.एस. राजामौलींनी (S. S. Rajamouli) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा वेगवेगळे रेकॉर्ड करत आहे. आता हा सिनेमा ब्रिटिश फिल्म इन्स्टीट्यूटमधील साइट अँड साऊंड मॅगजीनच्या या वर्षातील टॉप ५० (RRR In Top 50 Movies List) चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by RRR Movie (@rrrmovie)

    एसएस राजामौलींचा ‘आरआरआर’ या सिनेमाने ब्रिटिश फिल्म इन्स्टीट्यूटमधील साइट अँड साऊंड मॅगजीनच्या यादीत नवव्या स्थानावर उडी मारली आहे. राजामौलींनी टॉम क्रूझच्या ‘टॉप गन मेव्हरिक’ या सिनेमाला मागे टाकलं आहे. हा सिनेमा यादीत ३८ व्या क्रमांकावर आहे.

    ब्रिटिश फिल्म इन्स्टीट्यूटमधील साइट अँड साऊंड मॅगजीन दरवर्षी वर्षभरातील सर्वोत्कृष्ट ५० सिनेमांची यादी जाहीर करतात. या यादीत स्कॉटिश सिने दिग्दर्शक चोर्लोट वेल्स दिग्दर्शित ‘आफ्टर सन’ या सिनेमाने बाजी मारली आहे. हा सिनेमा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. ५० सिनेमांच्या यादीत समावेश होण्यासोबत ‘आरआरआर’ सिनेमाने आणखी दोन पुरस्कार पटकावले आहेत. या सिनेमाने ‘सर्वोत्कृष्ट विदेशी भाषा चित्रपट २०२२’ आणि ‘गोल्डन ग्लोब’ असे पुरस्कार मिळवले आहेत.

    ‘आरआरआर’ या सिनेमाला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हा सिनेमा  पुढील वर्षी ऑस्करसाठी पाठवण्यात येणार आहे.

    ‘आरआरआर’ या सिनेमात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा याचवर्षी मार्चमध्ये तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळ आणि हिंदी भाषेमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.