प्रेक्षकांच्या शिट्ट्यांची सलामी आणि RRR ची एन्ट्री तुफानी, चित्रपटामुळे भारावले सिनेरसिक

तगडी स्टारकास्ट, भव्यदिव्य सिनेमॅटिक एक्सपिरिअन्स आणि राजमौली यांचे सुरेख दिगदर्शन यामुळे ‘आरआरआर’ प्रेक्षकांना (Response To RRR)  भारावून टाकतो. चित्रपटातील ज्युनियर एनटीआर (Junior NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांची केमिस्ट्री आणि अभिनय चित्रपटाचा आत्मा आहेत.

    बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘रौद्रम रणम रुधिरम’ (RRR) आज सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे आठ हजार स्क्रीनवर रिलिज झालेल्या या चित्रपटाची तगडी स्टारकास्ट, भव्यदिव्य सिनेमॅटिक एक्सपिरिअन्स आणि राजमौली (S S Rajamouli) यांचे सुरेख दिगदर्शन यामुळे ‘आरआरआर’ प्रेक्षकांना (Response To RRR)  भारावून टाकतो. चित्रपटातील ज्युनियर एनटीआर (Junior NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांची केमिस्ट्री आणि अभिनय चित्रपटाचा आत्मा आहेत. हा चित्रपट पाहून लोक चित्रपटगृहात शिट्ट्या वाजवताना दिसत आहेत.

    IMDb ने १० पैकी ९.२ स्टार्स देत चित्रपटाला सुपरहिट घोषित केले आहे. चित्रपटाने प्री बुकिंग राइट्सच्या माध्यमातून आतापर्यंत ७५० ते ८०० कोटींचा गल्ला जमवला आहे. रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलिया भट्ट यांच्या मध्यवर्ती भूमिका असून अजय देवगणचा छोटा पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हा चित्रपट भारतीय इतहासातील ‘अल्लुरी सीताराम राजू ’ आणि ‘कोमाराम भीम’ या देशाच्या स्वातत्र्यासाठी प्राण प्रणाला लावून ब्रिटिश सरकार विरुद्ध लढणाऱ्या खऱ्या क्रांतिकारी योध्यांवर आधारित आहे.

    चित्रपटाची कथा सहज सोपी असली तरी मांडणी आणि अभिनयाच्या जोरावर चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालतो. राजामौली यांचा ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबीला द कनक्लूजन’ पेक्षाही आरआरआर वरचढ ठरला आहे. काही सिनेप्रेमिंनी या सिनेमाला ५ स्टार दिले आहेत. RRR काय काय रेकॉर्ड्स मोडतो याची आतुरता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.