‘या’ अभिनेत्रीच्या मनात आलेला आत्महत्येचा विचार, स्वत:च मुलाखतीत केला खुलासा!

माझ्याकडे मित्र-मैत्रीणी बनवायला देखील वेळ नव्हता. मी स्वत:ला सर्वांपासून लांब करुन घेतले होते. एकटेपणामुळे आत्महत्या करण्याचे विचार माझ्या डोक्यात येत होते’

  ‘बिग बॉस १४’ची विजेती रुबीना दिलैक. लवकरच ‘शक्‍त‍ि- अस्‍त‍ित्‍व के एहासास की’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. काही दिवसांपूर्वी ती बॉलिवूड गायिका नेहा कक्करचे व्हिडीओ साँग ‘मरजानिया’मध्ये पती अभिनव शुक्लासोबत दिसली होती. पण सध्या रूबीनाच्या एका धक्कादायक खुलास्याची चर्चा रंगली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

  रुबीनाचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. एक काळ असा होती की रुबीना कित्येक तास एकटी असायची, आत्महत्या करण्याचा विचार देखील तिच्या डोक्यात आला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये रुबीनाने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

   

  रूबीना म्हणाली, ‘मी ७ ते ८ वर्षांपूर्वी नैराश्याचा सामना करत होते. मला अस्थिर आणि असुरक्षित असल्या सारखे वाटायचे. मला त्या वेळी कळत नव्हते की मी काय करावे. मी माझी प्रोफेशनल आणि प्रायवेट लाइफ योग्य पद्धतीने सांभाळू शकत नव्हते. मी कुटुंबीयांपासून देखील लांब गेले होते. मी सतत काम करत रहायचे.

  माझ्याकडे मित्र-मैत्रीणी बनवायला देखील वेळ नव्हता. मी स्वत:ला सर्वांपासून लांब करुन घेतले होते. एकटेपणामुळे आत्महत्या करण्याचे विचार माझ्या डोक्यात येत होते’ असे रुबीना म्हणाली. त्यानंतर मी ऑनलाइन काउंसिलिंग थेरेपी घेतली. मी पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. मला फक्त शांतता हवी होती.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)