pushpa premier in russia

‘पुष्पा: द राइज’(Pushpa The Rise) रशियामध्ये आपल्या मेगा रिलीजसाठी सज्ज असून, अनेक भाषांमध्ये आपले आकर्षण निर्माण केल्यानंतर, या चित्रपटाचा रशियन भाषेतील ट्रेलर (Pushpa Russian Language Trailer) प्रदर्शित झाला आहे.

    अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा: द राइज’ने (Pushpa The Rise) यापूर्वी कधीही न पाहिलेल्या यशाची उदाहरणे निर्माण केली आहेत. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक भाषांमध्‍ये आपले वर्चस्व गाजवले असून, रिलीजच्‍या पहिल्‍याच दिवसापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची क्रेझ वाढताना पाहायला मिळालं आहे. आता ‘पुष्पा: द राइज’हा चित्रपट आता ८ डिसेंबर रोजी रशियामध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Pushpa (@pushpamovie)

    ‘पुष्पा: द राइज’ रशियामध्ये आपल्या मेगा रिलीजसाठी सज्ज असून, अनेक भाषांमध्ये आपले आकर्षण निर्माण केल्यानंतर, या चित्रपटाचा रशियन भाषेतील ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

    या चित्रपटातील कलाकार आणि क्रू यांच्या उपस्थितीत १ डिसेंबर रोजी मॉस्को आणि ३ डिसेंबर रोजी सेंट पीटर्सबर्ग येथे विशेष प्रीमियर होईल. तसेच, रशियातील २४ शहरांमध्ये होणार्‍या पाचव्या भारतीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे.

    ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी रशियात रिलीज होणार आहे. तसेच, या चित्रपटाने पूर्ण देशाला वेड लावले असतानाच, चाहते आता चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण टीम ‘पुष्पा: द रूल’ची तयारी करत आहे.