एस. एस. राजमौलीच्या ‘आरआरआर’ची जागतिक चित्रपट उद्योगाकडून प्रशंसा!

भव्य, नेत्रदीपक दृष्ये आणि मन गुंतवून टाकणार्‍्या कथानकामुळे आरआरआर हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या कोंदणातील हिरा तर बनला आहेच, पण त्याची भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट उद्योगाने प्रशंसा केलीये. अफलातून स्पेशल इफेक्टसबरोबरच (व्हीएफएक्स) नेत्रांचे पारणे फेडणारी भव्य दृष्ये याबद्दल या चित्रपटाची प्रशंसा तर होत आहेच, पण प्रेक्षकांनी त्याची तुलना मार्व्हल युनिव्हर्स चित्रपटांशी केलीये.

    550 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला आरआरआर हा भारतातील आजवरचा सर्वात खर्चिक चित्रपट समजला जातो. या चित्रपटात राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण तसेच आलिया भट यासारखे तीन-तीन सुपरस्टार एकत्र भूमिका साकारत असल्यामुळेही या चित्रपटाचे कौतुक होतंय. त्यातील अगदी वास्तववादी वाटणार्‍्या आणि डोळे फिरविणार्‍्या स्पेशल इफेक्टसची केवळ भारतातील तंत्रज्ञांनी प्रशंसा केली नसून जागतिक चित्रपट उद्योगानेही त्याबद्दल गौरवोद्गार काढलेत. या चित्रपटाबद्दल काही काढलेले प्रशंसोद्गार पहा-

    “आरआरआर’ हा अक्षरश: वेड लावणारा भव्य चित्रपट असून तो पाहताना मन स्तिमित होऊन जातं. तो पाहताना जणू मायकल बे, बाझ लुहरमन आणि स्टीफन चाऊ हे एकाच चित्रपटात एकत्र आल्यासारखं वाटतं. हा तब्बल तीन तासांचा दीर्घ चित्रपट असला, तरी तो अगदी चार तासांचाही होऊ शकला असता आणि मला तरीही तो पाहताना तितकाच आवडला असता. ” – ख्रिस्तोफर मिलर (21 जम्प स्ट्रीट, द लेगो मूव्ही, स्पायडरमॅन : इन्टू द स्पायडर व्हर्स चित्रपटांचे दिग्दर्शक).

    “आतापर्यंत एकाच चित्रपटात आणखी किती चित्रपट समाविष्ट करून टाकलेले कोणी पाहिलं आहे का? काय अफलातून चित्रपट आहे हा! काही दिवसांनंतरही माझ्या मनात अजून याच चित्रपटाचे विचार आहेत. ”– जोन स्पेटस (ड्यून, डॉ. स्ट्रेंज आणि पॅसेंजर्स चित्रपटांचे पटकथालेखक)
    “कसला अफलातून धमाल आणि थक्क करणारा प्रवास आहे हा! विलक्षण आवडला. ” – स्कॉट डेरिकसन (डॉ. स्ट्रेंजचा दिग्दर्शक).

    येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस 14 ऑगस्ट रोजी रात्री 8.00 वाजता आपल्या कुटुंबियांसह घरच्या निवांत वातावरणात ‘आरआरआर’च्या जागतिक टीव्ही प्रीमिअरचा आनंद घ्या फक्त ‘झी सिनेमा’ वाहिनीवर!