‘कोलकाता ते न्यूयार्क’ सोपा नव्हता सब्यसाची मुखर्जीचा प्रवास; नैराश्य झेललं, आत्महत्येचा प्रयत्नही केला, अनेक अडचणींना पार करत कमवलं नाव!

फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीच्या प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणींंवर मात करत आज त्याने त्याचं नाव जगभरात पोहोचवलं आहे.

  या वर्षीच्या मेट गाला (Met Gala 2024) मध्ये अभिनेत्री आलियानं सगळी लाईमलाईट आपल्या नावावर केली. हलक्या हिरव्या रंगाच्या साडीत आलिया एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती. तिच्या लूकला आणि साडीला खूप पसंत करण्यात येत आहे. तिची ही साडी फॅशन जगतात एक लोकप्रिय नाव असलेल्या डिझायनर सब्यासची मुखर्जीनं (Sabyasachi Mukherjee) तयार केली आहे. त्यासाठी त्याचं करावं तितकं कौतुक कमीचं आहे. या सोबतच आणखी एका कौतुकास्पद बाब म्हणजे सब्यासाची मुखर्जीनं डिझायनर म्हणून ‘मेट गाला’मध्ये पदार्पण केलंय आणि फॅशनच्या या सगळ्यात मोठ्या इव्हेंटमध्ये रेड कार्पेटवर चालणारा पहिला भारतीय डिझायनर बनला आहे. पण कोलकाता ते न्यूयार्क पर्यंत पोहोचण्याचा सब्यसाची हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. आज आपण जाणून घेऊया त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, त्याच्या संघर्षाबद्दल ज्यामुळे आज त्याचं नाव जागतिक पातळीवर पोहोचलं आहे.

  डिझायनर बनण्यासाठी सब्यसाची मुखर्जीने सोडलं  होतं घरं

  सब्यासची मुखर्जी आज लोकप्रिय लेबल ‘सब्यसाची’ चा संस्थापक आहेत. चित्रपट सेलिब्रिटींसाठी रेड कार्पेट कपडे तयार करण्यापासून ते सेलिब्रिटी नववधूंसाठी लग्नाच्या पोशाखांपर्यंत, सब्यसाची त्याच्या अनोख्या आणि आश्चर्यकारक डिझाइनसाठी ओळखली जातो. मात्र त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात जन्मलेल्या सब्यसाचीने 15 व्या वर्षी आपल्या पालकांना फॅशन आणि डिझायनिंगमधील रस असल्याबद्दल सांगितलं. त्याची सब्यसाचीची आई एका सरकारी-संलग्न कला महाविद्यालयात प्राध्यापक होती आणि त्यांना हस्तकलेची आवड होती, तर त्यांचे वडीलही नोकरी करत होते.
  कालातंराने त्याच्या वडिलांची नोकरी गेली. मग त्यांनी सब्यसाचीला फॅशन आणि डिझायनिंग करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत सब्यसाचीने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, सब्यसाचीने काही काळ गोव्यात वेटर म्हणून काम केले होतं. त्यानंतर त्याने ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी इंडिया’ मधील त्याच्या शिक्षणासाठी पैसे जमा करण्यासाठी त्याची पुस्तकंही विकली होती.

   20 हजार रुपये कर्ज घेऊन सुरू केला व्यवसाय

  1999 मध्ये, सब्यसाची मुखर्जीने ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी इंडिया’मधून पदवी पूर्ण केली. यानंतर, त्याने स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी बहीण पायलकडून 20,000 रुपये उसने घेतले आणि तीन लोकांसह फॅशनच्या जगात स्वतःचं नाव कमावण्यासाठी पहिलं पाऊल उचललं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sabyasachi (@sabyasachiofficial)

  नैराश्याचा केला सामना, आत्महत्येचाही केला होता प्रयत्न

  आज फॅशनच्या जगात जरी नाव कमावलं असेल तरी सब्यसाचीवर एक वेळ अशी आली होती की त्याने डिप्रेशचा सामना केला. त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. एका मुलाखती दरम्यान तो म्हणाला होता, “जेव्हा मी 17 वर्षांचा होतो, तेव्हा मी गंभीर नैराश्यात होतो. मी आत्महत्येचा प्रयत्न केला. तो एक अयशस्वी प्रयत्न होता. आजच्या काळात, मानसिक आरोग्याबद्दल अधिक स्पष्टपणे बोलंल जातं. पण हे लोकांना कळायला हव की त्याचा सामना करायला हवा कारण ते अगदी सामान्य आहे.”

  सब्यसाची मुखर्जी यांची एकूण संपत्ती

  रिपोर्ट नुसार, 2022 पर्यंत सब्यसाची मुखर्जीची एकूण संपत्ती 114 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. त्याचे कॅलिफोर्निया, अटलांटा, लंडन आणि दुबई येथे काही परदेशी व्यापाऱ्यांसह कोलकाता, नवी दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये अनेक स्टोअर्स आहेत. याशिवाय, त्याच्याकडे कोलकात्याच्या अलीपूरमध्ये ७,२५० स्क्वेअर फूट क्षेत्रफळात पसरलेला एक घरं आहे.