sabyasachi trolled for mangalsutra and bra

मंगळसूत्र कलेक्शनच्या(Mangalsutra Jewellery Collection) आक्षेपार्ह जाहिरातीबद्दल फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने माफी(Sabyasachi Mukherjee Apologized) मागितली असून त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर एक निवेदन जारी केले आहे.

    मंगळसूत्र ज्वेलरी कलेक्शनच्या(Mangalsutra Jewellery Collection) आक्षेपार्ह जाहिरातीबद्दल फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने अखेर माफी(Sabyasachi Mukherjee Apologised) मागितली आहे. त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर एक निवेदन जारी केले आहे आणि एका विशिष्ट वर्गाच्या भावना दुखावल्याबद्दल माफीही मागितली आहे. त्यांनी ही जाहिरात (Sabyasachi Controversial Advertisement Deleted)देखील मागे घेतली आहे आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ती हटवून टाकली आहे.

    फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी गेल्या काही दिवसांपासून मंगळसूत्र ज्वेलरी कलेक्शनवरून वादात सापडले आहेत. त्यांनी आपल्या लेबलची मंगळसूत्र जाहिरात मोहीम मागे घेतली असून, या जाहिरातीमुळे समाजातील एक घटक दुखावला गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या इशाऱ्यानंतर सब्यासाची यांनी हे जाहीर वक्तव्य केले आहे. नरोत्तम मिश्रा यांनी त्यांना ही जाहिरात काढून टाकण्यासाठी त्याला २४ तासांचा अल्टिमेटम देऊन, कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला होता.

    सब्यासाची मुखर्जीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी लिहिले, ‘वारसा आणि संस्कृतीला डायनामिक कान्सर्वेशन बनवण्याच्या संदर्भात, मंगळसूत्र मोहिमेचा उद्देश सर्वसमावेशकता आणि सशक्तीकरण याविषयी बोलण्याचा होता. या मोहिमेचा उद्देश एक सण म्हणून होता आणि त्यामुळे आपल्या समाजातील एक वर्ग दुखावला गेला आहे, यामुळे आम्हाला देखील खूप दुःख झाले आहे. त्यामुळेच आम्ही ‘सब्यासाची’ने ही मोहीम मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.’