mi honar superstar jallosh dancecha mahaantim sohla

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ६० स्पर्धकांनी स्वतःला सिद्ध केलं आणि त्यातील चार सर्वोत्तम स्पर्धकांनी महाअंतिम फेरी गाठली आहे. ‘मी होणार सुपरस्टार’चा महाअंतिम सोहळा (Mi Honar Superstar Mahaantim Sohla)२८ नोव्हेंबरला रंगणार आहे.

    प्रत्येक प्रतिभावान कलाकाराला त्याच्या कलेसाठी एक हक्काचं व्यासपीठ हवं असतं. ज्याद्वारे तो त्याची कला लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. डान्सचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांसाठी स्टार प्रवाह वाहिनीनं असाच एक मंच उभारला. स्पर्धकांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी एक प्रवास सुरू झाला तो म्हणजे ‘मी होणार सुपरस्टार – जल्लोष डान्सचा’(Mi Honar Superstar Jallosh Dancecha).

    महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ६० स्पर्धकांनी स्वतःला सिद्ध केलं आणि त्यातील चार सर्वोत्तम स्पर्धकांनी महाअंतिम फेरी गाठली आहे. ‘मी होणार सुपरस्टार’चा महाअंतिम सोहळा (Mi Honar Superstar Mahaantim Sohla)२८ नोव्हेंबरला रंगणार आहे.

    ashok saraf and nivedita in mi honar superstar jallosh dancecha

    nivedita madhurani and supriya

    लायन्स ग्रुप, विजय – चेतन, नेहुल – समीक्षा आणि मायनस थ्री या चार जणांमध्ये महाअंतिम लढत रंगेल. विशेष म्हणजे सचिन-सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक-निवेदिता सराफ यांच्या उपस्थितीनं महाअंतिम सोहळ्याची रंगत आणखी वाढणार आहे. सचिन-सुप्रिया यांनी खास गाण्यांवर परफॉर्म करत या सोहळ्याची शान वाढवली आहे. यासोबतच तेजश्री प्रधान आणि वैभव तत्ववादी यांचाही रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळेल. यासोबतच ‘आई कुठे काय करते’ आणि ‘स्वाभिमान’ मालिकेतील कलाकरही महाअंतिम सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.