ताडोबाची पाच वेळा सफर केल्यानंतर…..सचिनची केनियातील मासाई मारा नॅशनल पार्कमध्ये जंगल सफारी…अस्सल वाईल्ड लाईफ सफर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची पावलं सध्या मैदानाच्या ऐवजी जंगलाकडे वळत आहेत....सध्या तो केनिया,टांझानिया इथल्या जंगल सफारीवर गेला आहे. त्याठिकाणी त्याने कसा अनुभव आला याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे...पाहूया सचिनची वाईल्ड लाईफ सफर

  क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो कुटुंबासोबत रमताना नेहमीच दिसत असतो. तसंच, तो त्याचे छंद जोपासतानाही आपण त्याच्या सोशल मीडियाच्या पोस्टमधून पाहिलं आहे. सचिनला स्वयंपाकही करायला आवडतो. तशाप्रकारच्या त्याच्या अनेक पोस्ट आपण पाहिल्या आहेत. मकर संक्रांतीला तर चक्क त्याने तिळाचे लाडू केले होते. तर, वांग्यांचे भरीत करतानाचा व्हिडिओही शेअर करत त्याने चाहत्यांना धक्का दिला होता. (Sachin Tendulkar)(wild life)

  नुकताच सचिन 50 वर्षांचा झाला. मात्र, त्याने आपला हा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने कुटुंबासोबत साजरा केला. त्याच्या वाढदिवसाचे फोटोही व्हायरल झाले. यावेळी अंजली,सारा (sara tendulkar) आणि सचिन तेंडुलकर चक्क चूल पेटवत असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. (village)

  सारा,अंजली आणि सचिनने बीचवर जाऊन सुट्टीसोबत क्रिकेटचा आनंदही लुटला.

  आयपीएलच्या वेळी मुंबई इंडियन्सला चिअरअप करण्यासाठी सचिन न चुकता मैदानावर हजर असायचा. तसंच, यावेळी आपल्या मुलाला अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ला क्रिकेटच्या टीप्स द्यायला आणि प्रोत्साहन देण्यासाठी तो हजर होता.

  सचिन तेंडुलकरला जंगल सफारी करायला खूप आवडतं आतापर्यंत तो पाचवेळा ताडोबाच्या जंगल सफारीवर जाऊन आला आहे. सध्या सचिन अशाच एक जंगल सफारीवर गेला आहे.मासाई मारा नॅशनल पार्क हे केनियामधील एक मोठे गेम रिझर्व्ह केंद्र आहे. मारा प्रदेश हा टांझानियामधील सेरेनगेटी नॅशनल पार्कशी संलग्न आहे. मसाई मारा ग्रेट रिफ्ट व्हॅलीमध्ये आहे.  त्याने आपल्या इंन्स्टाग्रामवर यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

  इथियोपियाच्या लाल समुद्रापासून केनिया, टांझानिया, मलावी आणि इंटमधून हजारो किलोमीटर दूर आहे.मसाई मारामध्ये सिंह, बिबट्या, हत्ती, गेंडा आणि म्हैस तसंच, झेब्रा, जिराफ, हायना, चित्ता आढळतात. याच सफारीवर सध्या सचिन तेंडुलकर गेला आहे.