sachin tendulkar on ghoomer

सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन ‘घुमर’ चित्रपटाचं कौतुक केलंय.

  अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) यांच्या ‘घुमर’ (Ghoomer) या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी रिलीज झाला. अनेकांनी हा सिनेमा पाहून त्याचं कौतुक केलंय आता सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) देखील सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन ‘घुमर’ चित्रपटाचं कौतुक केलंय.

  सचिननं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

  या व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “मी नुकताच घुमर पाहिला. हा एक प्रेरणादायी चित्रपट आहे. इच्छाशक्ती, स्वप्न यांना कोणतीच सीमा नसल्याचं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, मला हे जाणवले आहे की, आयुष्यात चढ-उतार असतात. नेमके तेच हा चित्रपट आपल्याला दाखवतो. अपयश, दुखापती आणि निराशा या गोष्टी तुम्हाला आयुष्यात खूप काही शिकवतात. याच विषयावर हा चित्रपट आहे. मी तरुणांसाठीही म्हणेन की, हा चित्रपट तुम्हाला इतकं शिकवू शकतो की, आयुष्यात कधीही हार मानू नका आणि सर्व आव्हानांवर मात करा. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आव्हाने येणार आहेत. ते आव्हान स्विकारुन जिंकण्यातच मजा आहे.”

  सैयामी खेरनंदेखील एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सचिन तेंडुलकरसमोर बॉलिंग करताना दिसत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Saiyami Kher (@saiyami)


  या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, लहानपणीचं तुमचं असं कोणतं स्वप्न आहे जे कधीच पूर्ण होणार नाही असं वाटलं होतं? माझं असं स्वप्न होते की, एकेदिवशी मला माझा हिरो, माझी प्रेरणा, माझे शिक्षक सचिन तेंडुलकर यांना भेटायला मिळेल. त्यांना खेळताना पाहूनच मला या खेळाबद्दल आवड निर्माण झाली आणि मी हा खेळ शिकले. त्यांना खेळताना पाहण्यासाठी मी कॉलेज बंक केले आहे.

  पुढे तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘चेन्नई येथे 136, शारजाह स्टॉर्म, सिडनी येथे 241, पाकिस्तान विरुद्ध 98, ही यादी न संपणारी आहे. त्यांनी मला आनंद दिला, त्यांनी मला कसं लढायचं हे शिकवलं. जमिनीवर कसं राहायचं हे शिकवलं. नकळत त्यांनी मला कसं जगायचं हे शिकवलं. जेव्हा मी अभिनय करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या मित्रांनी मला सांगितलं, जा जा, अभिनय कर. एक दिवस सचिन तुझा चित्रपट बघेल आणि तेच माझे ध्येय बनलं. कठोर परिश्रम करत होते कारण मनात आशा होती की कधीतरी मास्टर माझे काम पाहतील आणि मग असं घडलं की, क्रिकेटच्या देवाने असा चित्रपट पाहिला ज्यामध्ये मी क्रिकेटरची भूमिका केली आहे. क्रिकेटच्या देवाने मला घूमरची गोलंदाजी कशी केली? हे दाखवायला सांगितलं. स्वप्नं खरोखरच सत्यात उतरतात. माझ्या आयुष्याच्या या भागाला आनंद म्हणतात.