sachit patil

अभिनेता सचित पाटील(Sachit Patil Comeback On Television) ‘अबोली’(Aboli) मालिकेद्वारे टेलिव्हीजनवर कमबॅक करत आहे. यात सचित इन्सपेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

    स्टार प्रवाहवर(Star Pravah) २३ नोव्हेंबरपासून ‘अबोली’(Aboli) ही नवी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेद्वारे अभिनेता सचित पाटील(Sachit Patil Comeback On Television) टेलिव्हीजनवर कमबॅक करत आहे. यात सचित इन्सपेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. सचितला याआधी ग्लॅमरस रुपात आपण पाहिलं आहे. त्यामुळं ‘अबोली’ मालिकेतला त्याचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

    या भूमिकेविषयी सचित म्हणाला की, मी खूपच एक्सायटेड आहे. पहिल्यांदा स्टार प्रवाहसारख्या वाहिनीसोबत काम करताना खूपच आनंद होतोय. मी स्टार प्रवाहवरील सगळ्या मालिका आवर्जून पाहातो. लिखाणाच्या दर्जापासून कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन या सर्व गोष्टी मला भावतात. त्यामुळं खूप दिवसांपासून या कुटुंबाचा भाग होण्याची इच्छा होती. ‘अबोली’च्या निमित्तानं हा योग जुळून आलाय. या मालिकेत मी इन्सपेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारत आहे. मी माझ्या करिअरच्या पहिल्या सिनेमात पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता ‘अबोली’मध्ये पुन्हा खाकी वर्दी परिधान करणार आहे. मालिकेचा विषयही खूप छान आहे. ‘अबोली’ नावाच्या मुलीच्या संघर्षाची ही गोष्ट आहे. छोट्या पडद्यामुळं दररोज प्रेक्षकांच्या घरात पोहोचून त्यांच्या कुटुंबाचा भाग होता येणार आहे.