sai tamhankar in postcards from maharashtra

नॅशनल जिओग्राफिकवर(National Geographic) 29 डिसेंबर 2022 पासून सुरू होणाऱ्या ‘पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र’ (Postcards From Maharashtra) या सात भागांच्या सीरीजला सई ताम्हणकर होस्ट करणार आहे. ऐतिहासिक प्रार्थनास्थळे, किल्ले, जुनी स्मारके यांच्यापासून ते ऐतिहासिक प्रार्थनास्थळे, औरंगाबादमधील युनेस्कोच्या वारसास्थळांपासून ते पुणे आणि नाशिकच्या दिव्य मंदिरांपर्यंतच्या ठिकाणांवरही या कथांमधून प्रकाश टाकण्यात येणार आहे.

  महाराष्ट्र हे असे ठिकाण आहे, जो अनेक ऐतिहासिक हॉटस्पॉट्स, रंगीबेरंगी धार्मिक स्थळे, गुहा आणि अन्नपदार्थांचा अप्रतिम संग्रह आहे. एक असे राज्य जे एका दिव्य, समृद्ध आणि चैतन्यशील संस्कृतीने ओतप्रोत भरले आहे. आपल्या कथाकथनाच्या स्फूर्तिदायक आणि अस्सल शैलीसह नॅशनल जिओग्राफिक इन इंडिया (National Geographic) अभिनेत्री सई ताम्हणकरसह (Sai Tamhankar) नव्या सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना एका अनुभवात्मक प्रवासाला घेऊन जाणार आहे. ‘पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र’ (Postcards From Maharashtra) या मालिकेद्वारे प्रेक्षकांना विविध आकर्षणांसहित या भारतीय राज्याची वैभवशाली अद्वितीय संस्कृती अनुभवायला लावणार आहे.

  कधी होणार सुरु?
  नॅशनल जिओग्राफिकवर 29 डिसेंबर 2022 पासून सुरू होणाऱ्या या सात भागांच्या सीरीजला सई ताम्हणकर होस्ट करणार आहे. ऐतिहासिक प्रार्थनास्थळे, किल्ले, जुनी स्मारके यांच्यापासून ते ऐतिहासिक प्रार्थनास्थळे, औरंगाबादमधील युनेस्कोच्या वारसास्थळांपासून ते पुणे आणि नाशिकच्या दिव्य मंदिरांपर्यंतच्या ठिकाणांवरही या कथांमधून प्रकाश टाकण्यात येणार आहे. सई शहरांमधील तोंडाला पाणी आणणारे खाद्यपदार्थ आणि शॉपिंगच्या अड्ड्यांचा शोध घेताना दिसणार आहे.

  मराठी मुलगी असल्याचा अभिमान – सई ताम्हणकर
  “महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सहकार्याने नॅशनल जिओग्राफिक हा अभ्यासपूर्ण कथाकथनासाठी ओळखला जाणारा ब्रँड एकत्र येत आहे. त्यांच्यासोबत माझे स्वतःचे राज्य एक्सप्लोर करणे ही माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. या संधीच्या माध्यमातून मला विविध ठिकाणांचं समोर न आलेलं सौंदर्य, रुचकर पदार्थ आणि समृद्ध मराठी संस्कृती यांबद्दलचं माझं प्रेम अनुभवण्याची आणि पुन्हा एकदा उजाळा देण्याची संधी मिळाली. या सीरिजचा भाग असल्यामुळे मला मराठी मुलगी असल्याचा अभिमान वाटला आणि या सीरिजचे माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान असेल,” असे सई ताम्हणकर म्हणाली.

  “नॅशनल जिओग्राफिकमध्ये, आम्ही अशा कथा आणण्याचा प्रयत्न करतो ज्यात आपल्या प्रेक्षकांचे प्रबोधन करण्याची आणि आपल्या सभोवतालच्या जगाला समजून घेण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणण्याची शक्ती आहे. आमच्या पोस्टकार्ड मालिकेसह, व्हिज्युअली जबरदस्त आकर्षक प्रतिमा आणि प्रभावी कथेसह राज्यातील सर्वात अद्वितीय वैशिष्ट्ये दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. निसर्ग आणि पाककृतींच्या प्रातिभा सौंदर्याला आलिंगन देणाऱ्या सुंदर महाराष्ट्र राज्य आपण या मालिकेतून दाखवले आहे. सई ताम्हणकर होस्ट असल्याने आम्हाला आनंद झाला आहे, ज्यामुळे प्रवासप्रेमींसाठी हा प्रवास एक परिपूर्ण पाहण्याचा अनुभव बनला आहे,” असे नॅशनल जिओग्राफिकच्या प्रवक्त्याने सांगितले.

  “अनोख्या प्राचीन चमत्कारांपासून ते हिरव्यागार हिरवळीपर्यंत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गोष्टीचा थोडाफार अनुभव घेता येतो. साई ताम्हणकरसह महाराष्ट्राचे खरे सौंदर्य टिपणारी आणि प्रेक्षकांना राज्याच्या न शोधलेल्या रत्नांच्या जवळ आणणारी मालिका एकत्र करणाऱ्या नॅशनल जिओग्राफिकशी जोडल्याचा आम्हाला आनंद आहे,” असे महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन संचालनालयाचे संचालक म्हणाले.