करीना कपूर सैफ अलीनं पापाराझींसमोरच एकमेकांना केलं किस, नेटिझन्सने सुरू केलं ट्रोलींंग

सैफ अली खान आणि करिना कपूर एकमेकांना किस करतानाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यावरुन त्यांना ट्रोलींगचाही सामना करावा लागत आहे.

  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि तिचा पती सैफ अली खान (Saif Ali Khan ) हे अनेकदा एकत्र दिसतात. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. याशिवाय दोघांचे एकत्र व्हिडीओही वारंवार समोर येत आहेत. नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक कपल दिसत आहे, मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स या जोडप्याला ट्रोल करत आहेत. काय आहे या व्हिडिओमध्ये ज्यावरुन ट्रोलींग सुरू झाली आहे, जाणून घ्या.

  करीना-सैफचा व्हिडिओ व्हायरल झाला

  सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये सैफ आणि करिना त्यांच्या घराबाहेर दिसत आहेत. करीना कपूर आणि सैफच्या दोघांनीही पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहेत. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की हे जोडपं आधी एकमेकांशी बोलतात आणि नंतर अचानक दोघेही लिप-लॉक करतात. त्यावेळी त्यांच्यासमोर काही लोकंही दिसत आहेत. करीना आणि सैफचा हा व्हिडिओ समोर येताच यूजर्स आश्चर्यचकित झाले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Voompla (@voompla)

  ट्रोलच्या निशाण्यावर सैफ करिना

  या व्हिडिओवर इटंरनेट यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने या व्हिडिओवर कमेंट केली की सार्वजनिकपणे चुंबन घेणे आवश्यक आहे का? दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘रस्त्यावर किस करा, ही कसली पद्धत आहे?’ तिसऱ्या यूजरने त्याच्यावर चित्रपट बनवायला हवा, अशी कमेंट केली. आणखी एका वापरकर्त्याने टिप्पणी केली की बेडरूम देखील लहान पडली. युजर्स आता या व्हिडिओवर अशा कमेंट करत आहेत. तर अनेक युझर्सनी त्यांच्या व्हिडिओवर लव्ह रिअॅक्ट देखील केलं आहे. काही युझर्सनी  त्यांना बॅालिवूडचं बेस्ट कपलही म्हण्टलं आहे.

  यापुर्वीही घडले असे प्रकार

  एखाद्या जोडप्याने आपल्या जोडीदाराला सार्वजनिकपणे किस करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वीही अशा गोष्टी अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र, यासाठी स्टार्सना अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. सैफ आणि करिनालाही नेटकऱ्यांच्या ट्रोलींगला सामोरं जावं लागत आहे.