saiyami kher in breathe into the shadows

‘ब्रीद: इनटू द शॅडोज’ (Breathe Into The Shadows) सीझन २  एक सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे ज्यामध्ये अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), अमित साध, नित्या मेनन, नवीन कस्तुरिया, सैयामी खेर आणि इवाना कौर हे कलाकार भूमिकेत आहेत.

    अमेझॉन प्राइमची (Amazon Prime) बहुप्रतीक्षित वेबसीरिज ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’ (Breathe Into The Shadows 2) चा सीझन २ अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक या वेधक कथानकाचा आनंद घेत आहेत. पहिल्या सीझनने आपल्या कथेसह प्रेक्षकांना वेड लावले असतानाच, या शोच्या दुसऱ्या भागात क्राईम ड्रामा थ्रिलरचे वेगवेगळे अध्याय पुन्हा उघडले असून, याला दर्शकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.

    ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’च्या दुसऱ्या सीझनमध्ये सैयामी खेरला (Saiyami Kher) तिच्या पात्रासाठी उदंड प्रेम मिळत आहे. तिच्या व्यक्तिरेखेबद्दल सैयामी खेर म्हणाली की, “ मी माझ्या भूमिकेशी खूप भावनिकरित्या जोडलेली आहे. आम्ही पूर्ण केलेल्या बहुतेक परियोजनेवर मी काम करत आहे. असे वाटते की, चित्रपट संपला आहे आणि आपण पुन्हा पात्र आणि त्या जगामध्ये परत जाऊ शकत नाही. ‘ब्रीद’ही एक अशी फ्रँचायझी आहे जिथे तुम्ही पात्रामध्ये परत जाऊ शकता कारण तुम्हाला ते आवडले आहे. प्रत्येक पात्राची एक दुसरी बाजू असते. पात्रांना अनेक स्तर होते, पण दुसऱ्या सीझनमध्ये मयंकने त्यात आणखी थर जोडले आणि कथा आणखी गुंतागुंतीची केली. मला आशा आहे की प्रेक्षकांना हे आवडेल.”

    अबुदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, आठ भागांची ही मालिका मयंक शर्मा यांनी दिग्दर्शित केली आहे. अर्शद सय्यद, विक्रम तुली, प्रिया सग्गी आणि अभिजित देशपांडे यांच्यासोबत सीझन २ची सह-निर्मितीदेखील केली आहे. ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’ सीझन २  एक सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे ज्यामध्ये अभिषेक बच्चन, अमित साध, नित्या मेनन, नवीन कस्तुरिया, सैयामी खेर आणि इवाना कौर हे कलाकार भूमिकेत आहेत. ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’ ही बहुप्रतीक्षित मालिका ९ नोव्हेंबरपासून भारत आणि जगभरातील २४० देशांमध्ये प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाली आहे.