प्रभासचा ‘सालार’ बॅाक्स ऑफिसवर सुसाट, सातव्या दिवशी कमावले 13.50 कोटी!

एकंदरीत चित्रपट रिलिज होण्याच्या पाचव्या दिवसापर्यंत सालारने बॉक्स ऑफिसवर 308.90 कोटींचा गल्ला जमवला आहे.

  बर्‍याच प्रतिक्षेनंतर प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ चित्रपट (Salaar) 22 डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आणि चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांनी तुफान गर्दी केल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांवर डंकीपेक्षा सालारची जादू अधिक झाल्याचं दिसत आहे. प्रभासच्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई करत वर्षातील सर्वात मोठ्या ओपनिंगचा रेकार्ड केला आहे. दिवसेंदिवस सालारच्या बॅाक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होत आहे.  चित्रपटाने पाचव्या दिवशी 13.50 कोटींची कमाई केली.

  ‘सालार’ ची आतापर्यंतची कमाई किती?

  अभिनेता प्रभासचा बिगबजेट चित्रपट आदिपुरुष दणक्यात आपटला होता. प्रभासचा साधा लुक प्रेक्षकांना प्रभावित करण्यास कमी पडला. मात्र आता प्रभासने ‘सालार’ चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केले. त्याच्या रांगड्या लूकने प्रेक्षकांना चांगलचं वेड लावलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पंसतीस उतरला होता. त्यानंतर प्रेक्षक त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखरे 22 डिसेंबरला चित्रपट रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतल्याचं दिसत आहे. Sacknilk ‘सालार’ नं च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सालार’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 95 कोटींची ओपनिंग केली आहे. आता सालारने रिलिजच्या दुसऱ्या दिवशी 55 कोटी कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी 62.05 तर चौथ्या दिवशी सालारने 42.50 कमावले होते आता रिलीजच्या पाचव्या दिवशी चित्रपटाने 23.50 कमावले आहेत. सहाव्या दिवशी 17 तर सातव्या दिवशी म्हणजे गुरुवारी 13.50 कमावले.  एकंदरीत चित्रपट रिलिज होण्याच्या पाचव्या दिवसापर्यंत सालारने बॉक्स ऑफिसवर 308.90 कोटींचा गल्ला जमवला आहे.

  सालार ने ‘या’ चित्रपटाचा मोडला रेकार्ड

  ‘सालार’ने ‘पठाण’, ‘जवान’, ‘डंकी’सहला ही मागे टाकत रिलीजच्या पहिल्याच दिवशी ९५ कोटींची ओपनिंग केली. या रेकार्डसह प्रभासचा हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.

  ‘सालार’ची स्टार कास्ट

  ‘सालार’ या पॅन इंडिया चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन, जगपती बाबू रेड्डी यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.