गायक सलील कुलकर्णी कोरोना पॉझिटीव्ह, सोशल मीडियावर लिहीली पोस्ट कारण…

सलील यांनी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे ट्वीट करत सांगितले आहे. ‘सर्वतोपरी काळजी घेऊनही आज माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

    राज्यात कोरोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आता प्रसिद्ध गायक, लेखक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

    सलील यांनी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे ट्वीट करत सांगितले आहे. ‘सर्वतोपरी काळजी घेऊनही आज माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. घरीच क्वारन्टाइन करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व औषधे सुरू केली आहेत. गेल्या एका आठवड्यात मला भेटलेल्या व्यक्तींना याची कल्पना असावी या दृष्टीने हे ट्वीट केले’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

    काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यांची लाडकी जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांच्या पाठोपाठ सलील कुलकर्णी यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.  बॉलिवूडच्याही अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय ‘संगीत देवबाभळी’ नाटकाच लेखक आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांनीही ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी स्वतःला घरात क्वारन्टाइन करून घेतलं आहे. त्यांच्यावरही उपचार सुरु असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सावध करत काळजी घेण्याची विनंती केली आहे.