Ekada Kaay Jhaale

गजवदना प्रॉडक्शन्स आणि शोबॉक्स एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेला ‘एकदा काय झालं...’(Ekda Kay Zala Movie) हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असून चित्रपटगृहं खुली होताच प्रदर्शित होणार आहे.

    ‘इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बोस्टन २०२१’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये(Nomination For Ekda Kay Zala Movie In Boston Film Festival) डॉ. सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) यांचं लेखन व दिग्दर्शन असलेल्या ‘एकदा काय झालं…’ (Ekda Kay Zala)या चित्रपटाचं विविध तीन विभागांमध्ये नामांकन झालं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट बालकलाकार आणि सर्वोत्कृष्ट गीत या तीन विभागांमध्ये चित्रपटाला नामांकन मिळालं आहे. याशिवाय ‘शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल २०२१’साठीसुद्धा या चित्रपटाची निवड झाली आहे.

    गजवदना प्रॉडक्शन्स आणि शोबॉक्स एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेला ‘एकदा काय झालं…’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असून चित्रपटगृहं खुली होताच प्रदर्शित होणार आहे. ‘इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बोस्टन २०२१’साठी सुमित राघवनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी, अर्जुन पूर्णपात्रेला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचं, तर ‘रे क्षणा…’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट गीतासाठी नामांकन मिळालं आहे. हे गाणं शंकर महादेवन यांनी गायलं असून, सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलं आहे. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी हे गाणं लिहिलं आहे.

    या चित्रपटात सुमितसोबत उर्मिला कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. अर्जुन पूर्णपात्रे या बालकलाकाराची यात मध्यवर्ती भूमिका आहे. ही एका गोष्ट सांगणाऱ्या माणसाची गोष्ट आहे.