tiger first poster

'टायगर 3' ने अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी 22.97 कोटी रुपयांची कमाई केली, तर रिलीजच्या तारखेच्या दिवशी 21.53 कोटी रुपयांची स्पॉट बुकिंगही झाली.

    अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) स्टारर टायगर 3 (Tiger 3) दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. प्रेक्षकक आणि समिक्षांकडून चित्रपटाचं कौतुक होत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीचं कलेक्शन समोर आलं असून टायगर 3 नं पहिल्याच दिवशी तब्बल 44 कोटींची (Tiger 3 box office collection day 1) कमाई केली आहे.

    टायगर 3  रविवारी रिलीज झाला. अनेक चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट हाऊसफुल्ल झाला होता. पहिल्या दिवशी हा चित्रपट पठाण आणि जवानचे रेकॉर्ड मोडेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. टायगर 3 ने पहिल्या दिवशी सुमारे 44 कोटी रुपयांची कमाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टायगर 3 सलमानचा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.  सलमान खानच्या भारत चित्रपटाने (2019),  42.30 कोटी रुपये कमावले होते, आणि सूरज बडजात्याच्या प्रेम रतन धन पायो (2015), ज्याने 40.35 कोटी रुपये कमवले होते. भारत आणि प्रेम रतन धन पायो हे दोन्हीही दिवाळीला प्रदर्शित झाले.  ‘टायगर 3’ ने अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी 22.97 कोटी रुपयांची कमाई केली, तर रिलीजच्या तारखेच्या दिवशी 21.53 कोटी रुपयांची स्पॉट बुकिंगही झाली.