
‘बिग बॉस १६’च्या (Bigg Boss 16) सेटवर सलमानने रेवतीला आमंत्रित केलं आणि तिला पाहून सलमान जुन्या आठवणींमध्ये रमला. तब्बल ३० वर्षांनी त्यांनी त्यांच्या चित्रपटातील ‘साथीया तूने क्या किया?’ या गाण्यावर डान्सही (Salman And Revathi Dance) केला.
‘बिग बॉस १६’ च्या (Bigg Boss 16) घरात नेहमी वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. या कार्यक्रमात अनेक कलाकार त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी हजेरी लावत असतात. नुकतंच अभिनेत्री रेवतीने सलमानच्या(Salman Khan) ‘बिग बॉस’मध्ये हजेरी लावली. प्रेक्षकांसाठी हा एक सुखद धक्का होता. सलमान आणि रेवती (Revathi) बिग बॉसच्या मंचावर एकत्र नाचताना दिसले.
#SalmanKhan & #Revathi After 30+ Years Dancing On ..”Saathiya Tune Kya Kia” #biggboss16 #Tiger3 🔥 @BeingSalmanKhan pic.twitter.com/z7R9g3L5dm
— Salman Sajid Bhai Jaan (@SalmanSajidBha7) November 27, 2022
बिग बॉस १६ च्या सेटवर काजोल आणि रेवतीने हजेरी लावली. ‘सलाम वेंकी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काजोल आणि रेवती बिग बॉसच्या मंचावर आल्या होत्या. रेवतीने दिग्दर्शित केलेल्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटामध्ये काजोल महत्त्वाच्या भूमिकेत आहे. काजोल आणि विशाल जेठावा यांचा ‘सलाम वेंकी’ ९ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सलमान आणि रेवती हे १९९० च्या ‘लव्ह’या चित्रपटात एकत्र झळकले होते. प्रेक्षकांना त्यांची जोडी चांगलीच पसंत पडली होती. मात्र नंतर या दोघांनी कधी एकत्र काम केलं आहे.
‘बिग बॉस १६’च्या सेटवर सलमानने रेवतीला आमंत्रित केलं आणि तिला पाहून सलमान जुन्या आठवणींमध्ये रमला. तब्बल ३० वर्षांनी त्यांनी त्यांच्या चित्रपटातील ‘साथीया तूने क्या किया?’ या गाण्यावर डान्सही केला. ३० वर्षांनी या दोघांना एकत्र एका मंचावर पाहून लोकांना खूप आनंद झाला. याचवेळी रेवती सलमानच्या ‘टायगर ३’ मध्ये झळकणार असल्याचं सलमानने जाहीर केलं. हे ऐकून काजोलही आश्चर्यचकित झाली. अर्थात रेवती नेमकी कोणत्या भूमिकेत दिसणार आहे हे अजूनतरी स्पष्ट झालेलं नाही.