
सलमानने बिना काक यांच्या उमंग या संस्थेला भेट दिली होती तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत सलमान सोबतच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा डान्स करताना दिसतेय.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खऱ्या आयुष्यात मात्र अनेकांसाठी मदतीचा हात पुढे करत असतो. सलमान खान अनेकांच्या मदतीला धावून जातो. याची अनेक उदाहरण आहेत. नुकताच सलमान खानने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यात तो बच्चेकंपनीसोबत डान्स करताना दिसतोय. सलमानने काही दिव्यांग मुलांसोबत धमाल केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय.
View this post on Instagram
सलमानने बिना काक यांच्या उमंग या संस्थेला भेट दिली होती तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत सलमान सोबतच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा डान्स करताना दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करत सलमानने कॅप्शन दिलं आहे. ” उमंगच्या मुलांसोबतच डान्स. ईश्वराचे आशिर्वाद सदैव तुम्हाला लाभो. लव्ह यू ऑल.” असं कॅप्शन त्यानं दिलंय.
View this post on Instagram
२१ मार्चला ‘डाउन सिंड्रोम डे’ पार पडला या निमित्ताने सलमानने एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. २०१९ सालात ‘दबंग’ सिनेमाच्या शूटिंगवेळी सलमानने सोनाक्षीसोबत या खास मुलांची भेट घेतली होती. सलमानच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळतेय.
View this post on Instagram